शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जागतिक वन दिन! राज्यातील वनसंपदेची भिस्त विदर्भावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 11:38 IST

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात ही टक्केवारी २० टक्क्यावर आहे. यामध्ये एकट्या विदर्भाची आकडेवारी ४० टक्कच्या वर असून विदर्भ वगळता राज्याची टक्केवारी आणखी खाली येणारी आहे.

ठळक मुद्देवनक्षेत्रात १४९ चौ.कि.मी पर्यंत घटजंगलवाढीचा दावा भ्रम

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात वनसंपदेत वाढ होण्यासाठी राज्य शासनाने गेल्या दोन वर्षापासून वृक्षलागवडीचे अभियान राबविले आहे. यामुळे सकारात्मक परिणाम दिसून येत असले तरी, हे परिणाम केवळ नागरी भागात दिसून येत आहेत. जंगल क्षेत्राची मात्र सातत्याने घट होत असल्याचा अहवाल डेहराडूनच्या वनसर्वेक्षण संस्थेने दिला आहे. २०१७ मध्ये ही घट १४९ चौरस किलोमीटर पर्यंत गेल्याचे धक्कादायक आकडे या संस्थेने दिले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात ही टक्केवारी २० टक्क्यावर आहे. यामध्ये एकट्या विदर्भाची आकडेवारी ४० टक्कच्या वर असून विदर्भ वगळता राज्याची टक्केवारी आणखी खाली येणारी आहे. त्यामुळे राज्याची एकूणच भिस्त ही आजही विदर्भावरच अवलंबून आहे, ही बाब मान्य करावी लागेल.महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र हे ३ लाख ७ हजार ७१३ चौ.कि.मी. एवढे आहे. २००९ च्या सर्वेक्षणात वनक्षेत्र ५०६५० चौ.किमी. होते, जे २०११ च्या आकडेवारीमध्ये ५०६४६ चौ.कि.मी. राहिले तर २०१५ मध्ये ते ५०६२८ चौ.कि.मी. पर्यंत घटल्याची नोंद आहे. अत्यंत घनदाट जंगलाच्या क्षेत्रातही चिंताजनक घट झाली आहे. २०१५ पासून १६ चा.कि.मी, आठ चौ.कि.मी व २०१७ मध्ये २४ चौ.कि.मी.ची घट झाली आहे. मध्यम दाट प्रकारात मोडणाऱ्या जंगलातही अशीच घट दर्शविणारी आकडेवारी समोर आली आहे. या सर्व प्रकारातील आकडेवारीनुसार गेल्या ५ वर्षात अत्यंत घनदाट, मध्यम घनदाट जंगलाच्या क्षेत्रात १४९ चौ.कि.मी. पर्यंत घट झाल्याचे सर्वेक्षणात नमूद केले आहे.वनसंपदेची भिस्त ही विदर्भावर अवलंबून असली तरी विदर्भातील जंगल क्षेत्रातच घट होत असल्याचे डेहराडूनच्या संस्थेच्या अहवालातून स्पष्ट होते. महाराष्ट्रामध्ये जे ‘अत्यंत घनदाट’ व सर्वसाधारण दाट जंगल प्रामुख्याने राज्यातील एकूण ३५ जिल्ह्यांपैकी ७ डोंगराळ जिल्हे व १२ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये आहेत. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ४३.४९ टक्के वनक्षेत्र हे या जिल्ह्यांमध्ये एकवटले आहे. यात विदर्भाचा वाटा मोठा आहे. २०११ च्या अहवालात ७ डोंगराळ जिल्ह्यांमध्ये ६ चौ. कि.मी. वनक्षेत्र कमी झाले आहे.

आताच्या २०१७ च्या अहवालात विदर्भातील अमरावती (९ चौ.कि.मी), चंद्रपूर (१२ चौ.कि.मी), गडचिरोली (१३ चौ.कि.मी.), अकोला (४ चौ.कि.मी.), बुलडाणा (७ चौ.कि.मी.) व यवतमाळ (६ चौ.कि.मी.) अशी भयावह घट नोंदविण्यात आली आहे.महाराष्ट्रात वनाच्छादनात झालेल्या घसरणीमागे असलेली करणेही या अहवालात अधोरेखित केली आहे. वनक्षेत्रावर शेतीसाठी होत असलेले अतिक्रमण हे एक कारण आहे. याशिवाय कोणत्याही प्रकल्पासाठी वनजमीनच हवी हा अट्टाहासही कारणीभूत आहे. २००७ ते २०१३ या कालावधीत महाराष्ट्रात ९८३८० हेक्टर वनजमीन शेतीसाठी वाटण्यात आली. हे सत्र अद्यापही थांबलेले नाही. २००५ ते २०११ या कालावधीत रेल्वेमार्ग, महामार्ग, खाणी, वीजनिर्मिती प्रकल्प आदी सामूहिक विकासाच्या प्रकल्पांसाठी ६६२७ हेक्टर वनजमीन वळविण्यात आल्याची शासकीय आकडेवारी उपलब्ध आहे. येणाऱ्या काळात वनविभागाला व राजकीय नेतृत्वाला या दोन्ही बाबींची गंभीर दखल घ्यावी लागेल.- किशोर रिठे,केंद्रीय वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य

टॅग्स :forestजंगल