शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक नेत्रदान दिवस; नेत्रपेढ्यांना सक्षम करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 10:35 IST

भारतात २२५ नेत्रपेढ्या आहेत, यातील केवळ १५ नेत्रपेढ्याच क्षमतेने काम करीत असल्याचे वास्तव आहे. ज्या नेत्रपेढ्या चांगले काम करतात त्यांना शासकीय व खासगी हॉस्पिटल जोडून लक्ष्य दिल्यास अंधत्व निवारणाला गती येणे शक्य असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञाचे मत आहे.

ठळक मुद्देअंधत्व निवारण सत्कर्माला खीळबुबुळ मिळाले ५४०, १३० लोकांचे अंधत्व दूर झाले

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुबुळासंबंधी येणारे अंधत्वाचे प्रमाण हे जगभरात चौथे मोठे कारण आहे. भारतात प्रतिवर्ष दरहजारामागे ७.३ लोक मृत्युमुखी पडतात, मात्र यातील ५२ हजार नेत्रदान करतात. गेल्यावर्षी राज्यात केवळ ५ हजार लोकांनीच नेत्रदान केले. ते प्रत्यारोपणासाठी गरज असलेल्या बुबुळांपेक्षा खूप कमी आहे. नागपूर जिल्ह्याचे चित्रही फारसे चांगले नाही. ‘राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत’ २०१७-१८ या वर्षांत नेत्रदानातून ५४० बुबुळ मिळाले परंतु १३० रुग्णांमध्येच प्रत्यारोपण होऊ शकले. विशेष म्हणजे, नागपूर विभागात सहा नेत्रपेढ्या आहेत परंतु मेडिकल व महात्मे नेत्रपेढी सोडल्यास इतरांकडून प्रभावी कामकाज होत नसल्याने अंधत्व निवारण सत्कर्माला खीळ बसत आहे.मोतीबिंदू, काचबिंदू, बुबुळ खराब होणे, जीवनसत्वाची कमतरता, मधुमेह, अपघात आदी कारणांमुळे ४० दशलक्ष लोकांना अंधत्व येते. भारतात हे प्रमाण १६ दशलक्ष आहे. यात बुबुळ खराब झाल्यामुळे अंधत्व आलेल्या लोकांची संख्या ११ लाख आहे. भारतात गेल्यावर्षी २६ हजार बुबुळ प्रत्यारोपण झाले. परंतु दरवर्षी याच्या दुप्पट म्हणजे ४० हजार रुग्णांची भर पडते. हे प्रमाण कमी करण्यासाठी दरवर्षी २ लाख ५० हजार बुबुळांची गरज आहे. मात्र ५० हजारच बुबुळ मिळतात, त्यातही ४० टक्के बुबुळ विविध कारणांमुळे वापरणे शक्य होत नाही. भारतात २२५ नेत्रपेढ्या आहेत, यातील केवळ १५ नेत्रपेढ्याच क्षमतेने काम करीत असल्याचे वास्तव आहे. ज्या नेत्रपेढ्या चांगले काम करतात त्यांनाच ठेवून त्यांना शासकीय व खासगी हॉस्पिटल जोडून लक्ष्य दिल्यास अंधत्व निवारणाला गती येणे शक्य असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञाचे मत आहे.

मेयोमध्ये केवळ ९ प्रत्यारोपणमेयोच्या नेत्ररोग विभागाला आरोग्य विभागाने ५० बुबुळ संग्रह व ३० बुबुळ प्रत्यारोपणाचे लक्ष्य दिले होते. मात्र, आवश्यक सोई व वरिष्ठांसह निवासी डॉक्टरांचा मोठा ताफा असतानाही केवळ नऊ बुबुळ प्रत्यारोपण झाले.

मेडिकल, महात्मे नेत्रपेढीमध्ये सर्वाधिक बुबुळ प्रत्यारोपणशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागाच्या नेत्रपेढीला २०१७-१८ वर्षात ७४ बुबुळ मिळाले. यातून ४८ लोकांचे अंधत्व दूर करण्यात आले. महात्मे नेत्रपेढीला १८२ बुबुळ मिळाले यातून ३६ लोकांचे अंधत्व दूर करण्यात आले. आय केअर एनकेपी साळवे इन्स्टिट्यूटला ९६ बुबुळ मिळाले यातून २० लोकांचे तर सुरज आय इन्सिट्यूटला १७ बुबुळ मिळून ८ लोकांचेच अंधत्व दूर करण्यात यश आले.

गेल्या तीन वर्षांपासून लक्ष्य अपूर्णच‘राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत’ २०१५-१६ या वर्षांत सहा नेत्रपेढ्यांसह तीन रुग्णालयांना ६५० बुबुळ प्रत्यारोपणाचे लक्ष्य दिले होते. यांना ४५२ बुबुळ मिळाले यातील ९५ लोकांचे अंधत्व दूर झाले. २०१६-१७मध्ये ६५० लक्ष्य दिले होते. ५६९ बुबुळ मिळून ९९ लोकांचे अंधत्व दूर झाले. गेल्या वर्षी म्हणजे २०१७-१८मध्ये लक्ष्य तेवढेच होते, ५४० बुबुळ मिळाले असलेतरी १३० लोकांनाच दृष्टी मिळू शकली.

‘नॅशनल कॉर्निअल ग्रीड’ झाल्यास नेत्रपेढ्या एका छताखाली येतील. त्यांच्या कामकाजात सुसूत्रता येईल. कोणत्या नेत्रपेढीत किती बुबुळ उपलब्ध आहेत, प्रतीक्षा यादी किती लोकांची आहे, याची माहिती उपलब्ध होऊन जास्तीतजास्त बुबुळ प्रत्यारोपण होतील.- डॉ. अशोक मदान, विभाग प्रमुख, नेत्ररोग विभाग, मेडिकल.

टॅग्स :Healthआरोग्य