शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

महिलादिनी कर्तृत्वान लेकींचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:10 IST

बुटीबोरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण सेनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त बोरखेडी (रेल्वे) येथील जिल्हा परिषद शाळेत ‘जिजाऊची ...

बुटीबोरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण सेनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त बोरखेडी (रेल्वे) येथील जिल्हा परिषद शाळेत ‘जिजाऊची लेक’ सन्मान साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच राजू घाटे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून पं. स. उपसभापती संजय चिकटे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व राजमाता जिजाऊ, क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना बाळकृष्ण वांधे यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन जिजाऊची लेक म्हणून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शिक्षक सेनेचे जिल्हा कोषाध्यक्ष रमेश गंधारे, आशा गोहणे, प्रमोद राऊत, दिलीप शेंडे, अनिल नाईक, जया अंबारे, अलका नायसे, माया गोतमारे, कुसुम मते, शैलजा तोंडुलवार तसेच माजी उपसरपंच अशोक मानकर, ग्रा.पं. सदस्य बंडू गोटे, हरीश फंड, कमलेश मून, रमेश झाकणेकर व गावातील महिलांची उपस्थिती हाेती.

....

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

गुमगाव : महिला दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षिकांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती हिंगणाच्या वतीने गौरव करण्यात आला. याप्रसंगी समितीच्या जिल्हा महिला आघाडीप्रमुख मीनल देवरणकर, कल्पना इंगळे, स्नेहा बांगडे, सुनंदा आष्टनकर, समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे, अनिल नासरे, श्रीराम महाजन, ईश्वर ठाकरे, मधुसूदन चरपे, नीळकंठ लोहकरे, सुरेश झाडे, प्रशांत कदम आदी उपस्थित होते. सक्रिय शिलेदार शिक्षिका भूषण पुरस्कार छाया नासरे यांना तर क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार सुनंदा विजय चर्जन यांना देऊन गौरवान्वित करण्यात आले.

प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अनिल वाकडे यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र कुकडे यांनी तर आभार सुषमा कदम यांनी मानले.

...

ग्रामपंचायत गाेंडखैरी

गाेंडखैरी : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खंडविकास अधिकारी महेंद्र डोंगरे, सरपंच चांगदेव कुबडे, ग्रामविकास अधिकारी हितेंद्र फुले, ग्रा.पं. सदस्य रवी कुबडे, लीलाधर कुबडे, प्रशांत धोटे, अश्विनी वैद्य, द्राैपदी ठाकरे, सरिता झोडापे, उषा मेहेरे, संगीता पंचभावे, प्रीती हावरे, ग्रामपंचायत कर्मचारी सुषमा राऊत, रजनी नागपुरे, अंगणवाडी सेविका कल्पना शेवाळे, गीता मानकर, सुशीला अतकरी, आशा सेविका व महिलांची उपस्थिती होती.

....

तायवाडे महाविद्यालय

कोराडी : तायवाडे महाविद्यालयातील महिला सेलच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त ‘टुडेज वूमन ए-मंत्र टू बी स्मार्ट, स्ट्राँग ॲण्ड सेफ’ या विषयावर आभासी पद्धतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून अमरावती येथील डॉ. पंकजा इंगळे उपस्थित हाेत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे होत्या. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे यांनी स्त्रीने सहनशील, शाेषिक असे कुठलेही टोकाचे निर्णय न घेता, मार्ग शोधून पुढे कसे जाता येईल, याचा विचार करावा. एवढेच नव्हे तर तिने संस्कृतीने ठरवून दिलेली आपली कामे करून पुढे गेली तर ती अधिक सन्मानित होईल, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वर्षा वैद्य यांनी केले. डॉ. प्रेरणा थोरात यांनी आभार मानले.

...

ग्रामपंचायत मनसर

रामटेक : तालुक्यातील मनसर ग्रामपंचायत येथे महिला दिनानिमित्त सत्कार साेहळा तसेच महाकृषी ऊर्जा अभियान कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच योगेश्वरी चाेखांद्रे हाेत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी नयन आलूरकर, उपकार्यकारी अभियंता आशिष तेजे, कनिष्ठ अभियंता परिताेष आगरकर, हेमंत देशमुख तसेच ग्रा.पं. संगीता पंधराम, स्वरूपा चौधरी, कांचन धनोरे, माजी सरपंच प्रमिला लोखंडे, माजी उपसरपंच कला तिवारी व गावातील महिलांची उपस्थिती हाेती. यावेळी महिलांना राेपटे देऊन गाैरविण्यात आले. एसडीपीओ नयन आलूरकर व सरपंच योगेश्वरी चाेखांद्रे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. महाकृषी ऊर्जा अभियानाबाबत आशिष तेजे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अजिंक्य मोहिले यांनी मानले.