गणेश हूडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: अहमदनगरमधील एका साध्या घरातील साधी मुलगी ते नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एनएमआरडीए)च्या आयुक्त असा शीतल उगले यांचा प्रवास. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण नगरच्या समर्थ विद्या मंदिर येथे झाले. बारावीत त्या बोर्डात गुणवत्ता यादीत आल्या. त्यानंतर पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्या विद्यापीठाच्या गोल्ड मेडल विद्यार्थी. त्यांचे मामा वरिष्ठ सरकारी अधिकारी. त्यांचा रुबाब, कामकाजातील शिस्त हे सगळे बघून उगले यांनी सनदी अधिकारी होण्याचा निर्धार केला. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास सुरू केला. लोकसेवा आयोगाच्या पहिल्याच प्रयत्नात त्या उत्तीर्ण झाल्या. भारतीय महसूल सेवेसाठी त्यांची निवड झाली. मात्र, त्यात त्यांना फारसा रस नव्हता. त्यामुळे त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षा दिली. त्यातही त्या उत्तीर्ण झाल्या. पुन्हा त्याच सेवेसाठी निवड झाली. यावेळी त्यांनी सेवेत प्रवेश केला, पण मन लागत नव्हते. तिसऱ्या प्रयत्नात त्या देशात त्या ३७ व्या मानांकनाने उत्तीर्ण झाल्या. दृढ आत्मविश्वासामुळे त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत संधी मिळाली. यात कुटुंबीयांचेही मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.२००९ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या शीतल उगले यांनी सन २००९ मध्ये नागपूरच्या परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर, २०११ मध्ये चंद्रपूर येथे सहायक जिल्हाधिकारी, चार वर्ष जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगडच्या जिल्हाधिकारी व नागपूरला येण्यापूर्वी त्या पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. जळगाव जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर खाली होता. त्याशिवाय बालमृत्यूचे प्रमाणही वाढले होते. यात बदल घडवून आणला.रायगडमध्ये जिल्हाधिकारी असताना आदिवासींना जमिनीचा हक्क मिळवून दिला. ३० हेक्टर जमीन त्यांच्या नावावर करण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. पुणे महापालिकेत असताना ११ हजार मिळकती महापालिकेच्या नावावर केल्यात. मिळालेल्या जबाबदाºया यशस्वीपणे पार पाडल्या.
Women's Day 2019; सेवेतून सर्वसामान्यांना न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 10:47 IST
अहमदनगरमधील एका साध्या घरातील साधी मुलगी ते नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एनएमआरडीए)च्या आयुक्त असा शीतल उगले यांचा प्रवास.
Women's Day 2019; सेवेतून सर्वसामान्यांना न्याय
ठळक मुद्दे‘एनएमआरडीए’ आयुक्त शीतल उगलेगुणवत्ता सिद्ध करा खुर्चीजवळ भेदभाव नसतो