शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

Women's Day 2019; लोकसेवेचे प्रशासकीय ‘सेवा’व्रत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 10:43 IST

मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी आशा पठाण नागपूरच्या प्रशासकीय क्षेत्रात एक डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळखल्या जातात.

ठळक मुद्देआशा पठाण यांचा कौतुकास्पद प्रवास ‘डॅशिंग’ महिला अधिकारी

आनंद डेकाटेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी आशा पठाण नागपूरच्या प्रशासकीय क्षेत्रात एक डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नागपूरच्या उपविभागीय अधिकारीपासून ते भूसंपादनापर्यंतच्या अनेक विभागाची जबाबादरी यशस्वीपणे सांभाळली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कामावर विश्वास ठेवून त्यांना नागपुरातील मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रमुख अधिकारी म्हणून जबाबदारी दिली. ही जबाबदारी त्या यशस्वीपणे पार पाडत आहेत. महिला दिनानिमित्त आशा पठाण यांच्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मनमोकळेपणाने चर्चा केली. आशा पठाण या मूळच्या बुलडाण्याच्या. एका मुस्लीम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील मुख्याध्यापक होते. घरचे वातावरण अतिशय संस्कारी आणि पुरोगामी होते. आशा या लहानपणापासूनच हुशार होत्या. त्या काळात पाचगणी येथील संजीवन विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावयाची होती.चौथ्यावर्गानंतर त्यांनी ही राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांना पाचगणीत प्रवेश मिळाला. दहावीपर्यंत त्या पाचगणीत शिकल्या. ११ वी व १२ वी पुन्हा बुलडाण्यात केले. अमरावतीच्या शासकीय इंजिनियरिंग कॉलेजमधून त्यांनी बी.ई. कॉम्प्युटरमध्ये ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर एक वर्ष लेक्चरशिप केले. दरम्यान, त्यांनी एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. तहसीलदार म्हणून त्या निवडल्या गेल्या. दुसऱ्या वर्षी पुन्हा त्यांनी परीक्षा दिली आणि त्या उपजिल्हाधिकारी झाल्या. नागपूर येथे विशेष भूसंपादन अधिकारी, गोसेखुर्द, मिहान, एमआयडीसी, नॅशनल हायवे, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले. उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आली तेव्हा अनेकांना वाटले की एक महिला अधिकारी या पदाला न्याय देऊ शकेल की नाही. परंतु त्यांनी आपल्या कामाने सर्वांनाच आपलेसे केले. आजही त्या तशाच निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करतात.महिलांना घर आणि नोकरी सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते, ही बाब खरी आहे. परंतु महिला अधिकाऱ्यांकडे पाहण्याची पूर्वीसारखी परिस्थिती आज राहिलेली नाही. प्रशासकीय सेवेतील किंवा नोकरी करणाºया महिलांनी केवळ त्या महिला आहेत म्हणून कारण सांगू नये. कारण ते काम त्यांनी स्वत:हून निवडलेले आहे.कुणीही त्यांना या क्षेत्रात या म्हणून जबरदस्ती केलेली नाही. तेव्हा मिळालेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी स्वीकारावी. घरी असाल तर घरातील संपूर्ण जबाबदारी पार पाडा आणि कामावर असाल तर तेथील जबाबादारी पूर्ण करा. उलट महिलांनी अधिक जोमाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी नोकरी करणाºया महिलांना केले आहे.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिन