शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

महिलेने नागपूर रेल्वेस्थानकावरच दिला बाळाला जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 12:54 AM

अंदमान एक्स्प्रेसने प्रवास करीत असलेल्या एका महिलेला प्रसुतीवेदना सुरु झाल्या. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करत असताना या महिलेला गाडीखाली उतरविण्यात आले. तेथेच त्या महिलेने मुलीला जन्म दिला.

ठळक मुद्देअंदमान एक्स्प्रेसने करीत होती प्रवास : आरपीएफच्या महिला कॉन्स्टेबलने केली मदत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अंदमान एक्स्प्रेसने प्रवास करीत असलेल्या एका महिलेला प्रसुतीवेदना सुरु झाल्या. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करत असताना या महिलेला गाडीखाली उतरविण्यात आले. तेथेच त्या महिलेने मुलीला जन्म दिला. यात आरपीएफच्या महिला कॉन्स्टेबलने या महिलेस मदत करून पुढील उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले.रेल्वेगाडी क्रमांक १६०३२ अंदमान एक्स्प्रेसने शबाना शब्बो (३२) रा. नामपल्ली, हैदराबाद ही महिला आपल्या तीन मुलांसह जनरल कोचने प्रवास करीत होती. अंदमान एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करीत असताना या महिलेच्या प्रसुतीवेदनेत वाढ झाली. त्यामुळे तिला इटारसी एण्डकडील भागात गाडीखाली उतरविण्यात आले. आरपीएफचे जवान बसंत सिंह यांनी ड्युटीवरील उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांना याबाबत सूचना दिली. त्यांनी लगेच निरीक्षक रवी जेम्स यांना कळवून आरपीएफच्या कॉन्स्टेबल अश्विनी मुळतकर यांना इटारसी एण्डकडील भागात महिलेच्या मदतीसाठी पाठविले. याबाबत स्टेशन उपव्यवस्थापक पंकज कुमार यांना सूचना देऊन रेल्वेच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. परंतु रेल्वे डॉक्टर पोहोचण्यापूर्वीय या महिलेने मुलीला जन्म दिला. त्यानंतर या महिलेस आरपीएफच्या महिलांनी बॅटरी कारने मेन गेटकडे आणले. तेथे रुग्णवाहिकेत बसवून या महिलेला पुढील उपचारासाठी मेयो रुग्णालयात रवाना करण्यात आले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर