शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची दीड लाख रुपयांनी फसवणूक

By admin | Updated: April 20, 2016 03:17 IST

निनावी फोन कॉलवर विश्वास ठेवत महिलेने त्यांच्याकडील एटीएम कार्डची संपूर्ण गोपनीय माहिती दिली.

आॅनलाईन खरेदी : निनावी फोनवर विश्वास ठेवणे अंगलटहिंगणा : निनावी फोन कॉलवर विश्वास ठेवत महिलेने त्यांच्याकडील एटीएम कार्डची संपूर्ण गोपनीय माहिती दिली. सदर व्यक्तीने सहा दिवसांत आॅनलाईन खरेदीच्या माध्यमातून त्या महिलेच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख ४५ हजार रुपयांची उचल केली. हा प्रकार हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामठा येथे नुकताच घडला.मनीषा महेश ढगे (३०, रा. जामठा) यांचे बँक आॅफ इंडियाच्या खापरी शाखेत बचत खाते आहे. त्यांच्या पतीच्या मोबाईलवर रविवारी (दि. ३) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ९५२५१३५५१३ क्रमांकाच्या मोबाईलवरून कॉल आला. हा कॉल मनीषा ढगे यांनी ‘रिसिव्ह’ केला. आपण बँकेच्या एटीएम आॅफिसमधून एटीएम आॅफिसर बोलत असल्याचे त्याने बतावणी केली. तुमचे एटीएम कार्ड बंद झाले आहे. ते चालू करावयाचे आहे काय, अशी विचारणा केली. त्यासाठी एटीएम कार्ड क्रमांक व पिन नंबर सांगण्याची सूचना केली. ढगे यांनी या फोन कॉलवर विश्वास ठेवत एटीएम कार्ड क्रमांक व पिन नंबर त्या व्यक्तीला सांगितला. त्यानंतर ३ एप्रिल ते ८ एप्रिल या काळात त्या व्यक्तीने आॅनलाईन खरेदीच्या माध्यामातून ढगे यांच्या खात्यातून १ लाख ४५ हजार रुपयांची उचल केली. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. निनावी फोनद्वारे माहिती विचारून बँक खातेदारांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढत आहेत. त्यामुळे खातेदारांनी त्यांच्या बँक खाते, एटीएम कार्ड क्रमांक, पीन नंबर याबाबतची गोपनीय माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला कधीही देवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ४२०, माहिती तंत्रज्ञान कायदा सहकलम ६६ (सी) अन्वये गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक वांदिले करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)