ग्रीन नेट बांधायला गेली अन् जीव गेला...
By जितेंद्र ढवळे | Updated: May 13, 2024 15:55 IST2024-05-13T15:53:40+5:302024-05-13T15:55:29+5:30
Nagpur : माळ्यावर ग्रीन नेट बांधतांना एका महिलेचा खाली पडून दुर्दैवी मृत्यू

Woman fall from first floor and lost her life...
नागपूर : उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून घराच्या पहिल्या माळ्यावर ग्रीन नेट बांधतांना एका महिलेचा खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला. विद्यानगर, बोखारा येथे ही घटना घडली. रत्नमाला मारुती शेंडे (४२) असे मृत महिलेचे नाव आहे.
रत्नमाला शेंडे या दि. ८ मे रोजी त्याच्या नातेवाईकाच्या मदतीने घराच्या पहिल्या माळ्यावर ग्रीन नेट बांधत होत्या. अचानक तोल गेल्याने त्याखाली पडल्या. यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना बोखारा येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तिथून त्यांना एम्समध्ये पाठविण्यात आले होते. त्यांचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांनी चार दिवस शर्थीचे प्रयत्न केले. सोमवारला सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले व मुली आहेत.