लोकमत न्यूज नेटवर्ककामठी : न्यू येरखेडा येथे दोन कुटुंबांत घरासमोरून जाण्यावरून शाब्दिक वाद विकोपाला गेला. त्यानंतर त्रिशिला मुकेश खोब्रागडे (४७, रा. साईकृपा सोसायटी) हृदयविकाराने मृत्यू झाला. भांडण करणाऱ्या शेजारी दाम्पत्यावर कारवाई करण्याची मागणी मृताच्या नातेवाइकांनी केली आहे.
नवीन कामठी पोलिस ठाण्यातील अंमलदार सपना राहुल माटे (४०) व त्यांचे पती राहुल रंगारी हे दोघेही पोलिस विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या शेजारी एअर फोर्स आमला मध्य प्रदेश येथे कार्य करणारे मुकेश खोब्रागडे यांची पत्नी त्रिशीला व दोन मुली राहतात. रविवारी (दि. २९) रात्री आठ वाजता सुमारास सपना माटे घरी आल्या. त्रिशिला खोब्रागडे यांनी घरासमोर सिमेंट ओटा बांधल्याने वाहन नेताना अडचण निर्माण होत असल्या कारणाने दोन्ही कुटुंबात शाब्दिक वाद निर्माण झाला. त्रिशला खोब्रागडे या रात्री नऊ वाजता सुमारास नवीन कामठी पोलिस स्टेशनला जाऊन भांडणाची हकीकत सांगितली. सपना माटे व राहुल रंगारी यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
त्रिशिला खोब्रागडे रविवारला रात्री दहा वाजता सुमारास घरी परत आल्या असता त्यांचा रक्तदाब वाढल्याने प्रकृती गंभीर झाली. त्यांना कामठी कळमना मार्गावरील खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले असता उपचारादरम्यान रात्री साडेअकरा वाजता सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
Web Summary : In Nagpur, a verbal dispute over access led to Trishila Khobragade's heart attack and death. Relatives demand action against the neighbor couple, both police officers, after an argument about a cement platform obstructing vehicle passage. She complained to the police before her death.
Web Summary : नागपुर में, पहुँच को लेकर एक मौखिक विवाद के बाद त्रिशिला खोब्रागडे को दिल का दौरा पड़ा और उनकी मौत हो गई। रिश्तेदारों ने पड़ोसी दंपति के खिलाफ कार्रवाई की मांग की, दोनों पुलिस अधिकारी हैं, वाहन मार्ग में बाधा डालने वाले एक सीमेंट प्लेटफॉर्म के बारे में बहस के बाद। उसने अपनी मृत्यु से पहले पुलिस में शिकायत दर्ज कराई।