शहरं
Join us  
Trending Stories
1
'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या
2
अयोध्येला जाणाऱ्यांची संख्या घटली, स्पाइसजेटनं विमान सेवा बंद केली!
3
तो फोन शेवटचा! मुलांना मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला अन्...; काळजात चर्र करणारी घटना
4
पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी वाराणसीबाबत अजय राय यांनी दिला असा मेसेज, वाढू शकतं मोदींचं टेन्शन
5
Fact Check : राष्ट्रगीत सुरू होतं आणि पंतप्रधान मोदी खुर्चीवर बसले?; जाणून घ्या 'सत्य'
6
गुरुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वृद्धी योग; वरदान काळ, तुमची रास कोणती?
7
Sushant Singh Death Anniversary : सुशांतच्या बहिणीने शेअर केला थ्रोबॅक व्हिडीओ; म्हणाली - 'हा राजकीय अजेंडा...'
8
BEST Bus Breakdowns: नुसता वैताग! बेस्ट बस भर रस्त्यात बंद पडण्याचं प्रमाण वाढलं, ६ महिन्यांत २११ वेळा घटना
9
सचिन तेंडुलकरला "तेंडल्या" म्हटल्याने राज ठाकरेंनी सिद्धार्थला सुनावले होते खडेबोल, अभिनेत्याने सांगितला किस्सा
10
'मधुबाला' फेम अभिनेत्रीने लग्नानंतर ९ वर्षांनी दिली गुडन्यूज, वयाच्या 38 व्या वर्षी देणार बाळाला जन्म
11
Kangana Ranaut : कंगनाला मिळणार इतका पगार; मोफत घरासह आलिशान सुविधा, खासदार झाल्यावर बदलणार आयुष्य
12
National News धक्कादायक! मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यातून अचानक पैसे गायब; बँकेत घातला गोंधळ
13
Durgashtami: आज शुक्रवार आणि दुर्गाष्टमी, या संयोगावर घरच्याघरी करा लक्ष्मी कुंकुमार्चन; होतील अनेक लाभ!
14
"फोटोत दिसताय त्याप्रमाणे नेहमी हसत...", राज ठाकरेंच्या वाढदिवशी प्राजक्ताची खास पोस्ट
15
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची तरुणाईमध्ये क्रेझ; तुम्हाला माहितीये का बिहारच्या या लेकाचं शिक्षण?
16
खासदार होताच युसूफ अडचणीत; गुजरातमधील सरकारी भूखंडावर कब्जा केल्याप्रकरणी नोटीस
17
हमासनंतर आता हिजबुल्लाहनं उडवली इस्रायलची झोप, 250 रॉकेट डागले; मोठं युद्ध भडकण्याची शक्यता 
18
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाचं आमंत्रण मिळाल्यावर पूनम ढिल्लो म्हणाल्या, "जहीर, प्लीज तिला..."
19
'आधी प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, नंतर अहंकार आला, म्हणून...', RSS नेते इंद्रेश कुमार यांचा भाजपवर निशाणा
20
PHOTOS : अमेरिकेत 'सूर्या'चा रोमँटिक अंदाज! भारतीय शिलेदाराची पत्नीसोबत भटकंती

ऐन अंत्यसंस्काराच्या वेळी घडला अनर्थ : स्लॅब कोसळून महिलेचा मृत्यू, आठ महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 10:23 PM

अंत्ययात्रेसाठी आलेल्यांपैकी काही महिला जागा नसल्याने घराच्या स्लॅबवर चढल्या. मात्र, बांधकाम नवीन व कच्चे असल्याने वजनाने स्लॅब कोसळली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला तर आठ महिला जखमी झाल्या. जखमींमध्ये तीन तरुणींचा समावेश आहे. ही घटना मांढळ नजीकच्या टाकळी (ता. कुही) येथे शुक्रवारी घडली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील टाकळी कुही येथे घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (मांढळ) : अंत्ययात्रेसाठी आलेल्यांपैकी काही महिला जागा नसल्याने घराच्या स्लॅबवर चढल्या. मात्र, बांधकाम नवीन व कच्चे असल्याने वजनाने स्लॅब कोसळली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला तर आठ महिला जखमी झाल्या. जखमींमध्ये तीन तरुणींचा समावेश आहे. ही घटना मांढळ नजीकच्या टाकळी (ता. कुही) येथे शुक्रवारी घडली.विमल रमेश भोयर (४५) असे मृत महिलेचे नाव असून, जखमींमध्ये शकुंतला महादेव डोळस (४२), गोदाबाई जयपाल खराबे (५०), राधाबाई कृष्णा ईश्वरकर (४२), रत्नमाला मनोहर रामटेके (४०), आचल रमेश भोयर (१६), मेघा छबिलाल नानवटकर (१७), मोनिका युवराज भोयर (२१) व निकिता दिलीप ठवकर (१७) सर्व , रा. टाकळी, ता. कुही यांचा समावेश आहे.आशिष अशोक भोयर (२६, रा. टाकळी) हा काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान गुरुवारी (दि. २५) रात्री त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करणार होते. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांसह गावातील नागरिक अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी त्याच्या घरी गोळा झाले होते.घराच्या अंगणात उभे राहण्यासाठी जागा नसल्याने काही महिला घराच्या स्लॅबवर चढल्या. त्या घराचे नव्याचे बांधकाम करण्यात आले असून, बांधकाम पक्के व्हायचे होते. त्यातच महिलांच्या वजनामुळे स्लॅबचा काही भाग कोसळला. त्यात सहा महिला व तीन तरुणींना दुखापत झाली. शिवाय, विमल यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना लगेच साळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे प्रथमोपचार केल्यानंतर नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. इतर जखमींवर साळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून सुटी देण्यात आली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली होती.

 

टॅग्स :Building Collapseडोंगरी इमारत दुर्घटनाDeathमृत्यू