शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

महाजनांच्या मदतीला फडणवीस धावले; विरोधकांना खडे बोल सुनावत माफी मागायला सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 2:57 PM

सोमवारी विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला.

नागपूर - उद्धव ठाकरे सभागृहात आले त्यामुळे कदाचित गिरीश महाजन आणि सलीम कुत्ता हा विषय पुढे आणला. आरोपाची खातरजमा न करता मंत्र्यांवर आरोप केले गेले. गिरीश महाजन यांच्यावर बेछुट आरोप केल्याबद्दल विरोधकांनी माफी मागितली पाहिजे. विरोधकांनी लावलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले. 

सोमवारी विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला. त्याचसोबत सलीम कुत्तासोबत महाजन उपस्थित असल्याचा फोटो दाखवला. त्यावरून सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला. ठाकरे गटाचे अनिल परब आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांचा राजीनामा मागितला. या संपूर्ण प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात खुलासा करत विरोधकांवर पलटवार केला. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या लग्नात गिरीश महाजन गेले होते, तिथे सगळ्या पक्षाचे नेते, अधिकारी होते. ते लग्न नाशिकमधील मुस्लीम धर्माचे सर्वात मोठे धर्मगुरू शहीरे खातिब यांच्या पुतण्याचे होते. त्या लग्नात पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन गेले होते. शहीरे खातिब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही. ज्या मुलीशी लग्न झाले तिच्या वडिलांच्या सासरमधील एक नातेवाईक दाऊदच्या कुठल्यातरी भावाशी लग्न झाले असा आरोप करण्यात आला होता. पण ज्यांच्याशी लग्न झाला त्यांचा कुठेही दाऊदशी संबंध नाही, कुठलाही आरोप नाही. कुठलाही गुन्हा दाऊदशी संबंधाचा नाही. तथापि ज्यावेळी अशाप्रकारचा आरोप माध्यमात झाला तेव्हा २०१७-१८ मध्ये मी गृहमंत्री म्हणून चौकशी समिती नेमली होती आणि तत्कालीन डीसीपींच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने दिलेल्या अहवालात शहीरे खातिब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही असा रिपोर्ट दिला होता. 

त्याचसोबत आज उद्धव ठाकरे आले त्यामुळे कदाचित अशाप्रकारचे विषय आले असतील.पण एका मंत्र्यांवर असे आरोप लावताना त्याची खातरजमा न करता आणि ज्या प्रकरणाची चौकशी आधीच झालीय. अशाच प्रकारची तडफड जे बडगुजर सलीम कुत्तासोबत नाचतात तेव्हा का दाखवली नाही? कुठलाही संबंध नाही पण मंत्र्यावर अशाप्रकारे बेछुट आरोप केल्याबद्दल माफी मागितली पाहिजे. विरोधकांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत असंही फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.  

काय म्हणाले होते अंबादास दानवे?एकनाथ  खडसे, अनिल परब यांनी ज्या मंत्र्यावर आरोप केले. नाशिकमध्ये २०१७ मध्ये एक लग्न झाले होते. लग्न हा खासगी विषय आहे. पण या लग्नात आयबीचे लोक होते. या लग्नामध्ये सहभागी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. सुधाकर बडगुजर यांचा एक फोटो प्रसिद्ध झाला. पण सलीम कुत्ता १९९८ मध्ये मेलाय असा दावा विधानसभेच्या आमदाराने केला याबाबत माहिती नाही. गिरीश महाजन या लग्नात होते. महाजन हे जबाबदार मंत्री आहेत. सभागृहात हा फोटो महाजनांचा आहे त्यांच्यावर कारवाई का नाही असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. यावेळी विरोधक आणि सत्ताधारी आमदारांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGirish Mahajanगिरीश महाजनNagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशनDawood Ibrahimदाऊद इब्राहिम