शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

'ट्रॅक्टर चालविणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच ...'; विधिमंडळ परिसरात रंगला आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा

By मंगेश व्यवहारे | Updated: December 12, 2023 06:34 IST

ट्रॅक्टर चालविणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच बघितला : ठाकरे

मंगेश व्यवहारेनागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे सभागृहात आले आणि पहिल्याच दिवशी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह सरकारच्या कार्यप्रणालीवर टीका केली. लोकांच्या घरादारावरती नांगर अन् समुद्रावर ट्रॅक्टर चालविणारा मुख्यमंत्री मी पहिल्यांदाच पाहिला, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले. उद्धव ठाकरेंबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तो ट्रॅक्टर कशाचा होता, याची माहिती त्यांनी घ्यायला हवी होती. तो बिच कॉम्बर होता. बिच कॉम्बरमध्ये असलेल्या जाळीत समुद्राच्या काठावरील सर्व कचरा संकलित होतो आणि त्याचे विघटन होते, पण दुर्दैव आहे बोलणाऱ्यांनी पूर्ण माहिती घ्यायला हवी होती. ज्यांनी मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर जेसीबी चालविला त्यांना हे काय कळणार? अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

उद्धव ठाकरेंना माझी अडचण होतेय, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी दिल्लीला, तेलंगणाला गेलो, गावी गेलो वा बिचवर स्वच्छता करायला गेलो, तरी यांना अडचण आहे. महाराष्ट्राला घरी बसणारा मुख्यमंत्री पाहिजे की, दिल्ली ते गल्ली फिल्डवर काम करणारा मुख्यमंत्री हवा, याचा विचार करायला हवा. मी फिल्डवर काम करणारा मुख्यमंत्री आहे. फेसबुक लाइव्हवर काम करत नाही.

मी मुख्यमंत्री असताना कर्जमाफी केली

अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर चढला आहे. बँकांकडून कर्जाचा तगादा लावला जात आहे. आज त्यांचा कुणीही वाली नाही. शेतकरी आपले अवयव विकायला तयार झाले आहेत. अशी परिस्थिती यापूर्वी कधीही शेतकऱ्यांवर आली नव्हती. मी मुख्यमंत्री असताना कर्जमाफी केली होती. या सरकारला कळवळा असेल, तर पंचनाम्याचे थोतांड बंद करून कर्जमाफी द्यावी, अशी रोखठोक मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

आम्ही शेतकऱ्यांना १२ हजार कोटींची मदत केली

 शिंदे म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर आहे. जेव्हा-जेव्हा संकट आले, तेव्हा-तेव्हा सरकार शेतकऱ्याच्या मदतीसाठी उभे राहिले. आतापर्यंत शेतकऱ्यांना १२ हजार कोटींची मदत देण्यात आली आहे. मी आणि फडणवीस स्वत: बांधावर गेलो आणि नुकसानीची पाहणी केली. जे बोलत आहेत ते चार दिवसांनंतर अधिवेशनात आले, ते किती गंभीर आहेत, याचा विचार त्यांनीच करावा.

पटेलांना पण तोच न्याय लावणार का?

भाजपने नवाब मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आम्ही आदर करतो, पण नवाब मलिकांना जो न्याय लावला, तो प्रफुल्ल पटेलांना लावून तुम्ही त्यांच्यापासून अंतर ठेवणार का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

याकुबच्या कबरीचे उदात्तीकरण काेणी केले?

ज्यांच्यावर बॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्यांना मंत्रिमंडळात ठेवले, तसेच याकुब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण केले, त्यांना आता बोलण्याचा अधिकार नाही असा टाेला मुख्यमंत्री शिंदे  यांनी लगावला

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनShiv Senaशिवसेना