शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

यंदा सोयाबीन दर 'एमएसपी' एवढे तरी राहणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 14:40 IST

खाद्यतेलावरील आयात शुल्क कपात : पुढील हंगामात बसणार फटका

सुनील चरपे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने कच्च्या सोयाबीन, सूर्यफूल व पाम तेलावरील आयात शुल्क २० टक्क्यांवरून १० टक्के केला आहे. या तिन्ही तेलांची आयात वाढणार असून, ऑक्टोबरपासून पुढे सोयाबीनचे दर किमान आधारभूत किमती (एमएसपी) पेक्षा कमी राहण्याचा धोका आहे. परिणामी, सरकारच्या या निर्णयाचा देशातील सोयाबीन उत्पादकांना जबर फटका बसण्याची शक्यता आहे.

सरकारने २०२४ मध्ये कच्च्या खाद्यतेलावर २० टक्के, तर रिफाइंड खाद्यतेलावर २९.७५ टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावला होता. उपकर विचारात घेता कच्च्या खाद्यतेलाच्या आयातीसाठी २७.५० टक्के, तर रिफाइंड तेलासाठी ३५.७५ टक्के शुल्क द्यावा लागायचा. देशात सोयाबीन पेरणीची धावपळ सुरू असताना केंद्र सरकारने ३० मे रोजी कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्कमध्ये ५० टक्क्यांनी कपात केली आहे. रिफाइंड सोयाबीन, सूर्यफूल व पामतेलावरील आयात शुल्क कायम ठेवले आहे. कच्च्या खाद्यतेलाच्या आयातीला उपकरांसह १६.५० टक्के कर भरावा लागणार असल्याने आयात वाढणार आहे. हा निर्णय खाद्य तेल उत्पादकांच्या फायद्याचा ठरणार आहे. मान्सूनच्या पावसाने वर्दी दिल्याने शेतकऱ्यांची खरीप पेरणीसाठी लगीनघाई सुरू झाली आहे. मराठवाड्यात सोयाबीनचा पेरा आटोपण्यावर भर आहे.

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये येणार परदेशातून तेलयात सर्वाधिक कच्च्या सोयाबीन व पामतेलाची आयात केली जाणार आहे. देशातील आयातदारांनी सौदे सुरू केले असून, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये ते तेल देशात येईल. त्यानंतर शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येणार असल्याने त्यावेळी दर ४,००० ते ४,३०० रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास राहण्याची शक्यता शेतमाल बाजार तज्ज्ञ विजय जावंधिया यांनी व्यक्त केली आहे.

पेरणीपूर्वीच ब्राझीलच्या बाजारात सौदे झाले सुरू

  • ब्राझीलमध्ये सोयाबीनची पेरणी सुरू व्हायची आहे. मात्र, तेथील शेतकऱ्यांनी वायदे बाजारात सन २०२६ साठी त्यांच्या सोयाबीनचे ११ डॉलर प्रतिबुशेल (एक बुशेल- २७.२२ किलो) दराने आताच सौदे केले आहेत.
  • त्यामुळे जागतिक बाजारात सोयाबीनचे दर ३,४५८ ते ३,५५० रुपये प्रतिक्विंटल असेल.
  • यावर्षीच्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारने सोयाबीनची एमएसपी ५,३२८ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली आहे.

लागवड २ लाख हेक्टरने कमी होणारमागील वर्षीच्या कमी उत्पन्नामुळे यंदा सोयाबीनच्या लागवडीवर परिणाम होणार असून, लागवड २ लाख हेक्टरने कमी होणार असल्याची माहिती राज्य कृषी विभागाने दिली. परिणामी यंदा सोयाबीन घ्यावे की नाही, अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदा महाराष्ट्रात एकूण १४४.९७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. यामध्ये धान्य, कडधान्य, तेलबिया आणि कापूस यांचा समावेश आहे

टॅग्स :Soybeanसोयाबीनnagpurनागपूर