शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निलंबित केल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही का ?

By admin | Updated: April 23, 2016 02:57 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी निरीक्षण अहवालातील माहितीने व्यथित होऊन जुना पारडी नाका ....

हायकोर्टाने शासनाला फटकारले : भंडारा रोडवर अवैध पार्किंगची समस्यानागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी निरीक्षण अहवालातील माहितीने व्यथित होऊन जुना पारडी नाका (भंडारा रोड) परिसरातील अवैध पार्किंगची समस्या दोन-तीन वाहतूक पोलिसांना निलंबित केल्याशिवाय सुटणार नाही का अशा शब्दांत शासनाला फटकारले. तसेच, निरीक्षण अहवालावर एक आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.१८ मार्च २०१६ रोजी न्यायालयाने अ‍ॅड. हर्निश गढिया यांची कोर्ट कमिश्नर म्हणून नियुक्ती केली होती. त्यांना पारडी नाका परिसराचे दहा दिवस निरीक्षण करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. गढिया यांनी या आदेशाचे पालन करून न्यायालयात अहवाल सादर केला. पारडी नाका परिसरातील नो पार्किंग झोनमध्ये ट्रक, खासगी बसेस व इतर वाहने तासन्तास उभी असतात. अपार्टमेंटपुढेही वाहने उभी केली जातात. २५ मार्च व २७ मार्च २०१६ रोजी दुपारी अनेक पोलीस कर्मचारी व वाहतूक पोलीस या परिसरात होते. परंतु, ते नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करण्याचे सोडून हेल्मेट नसलेले दुचाकीचालक व सीटबेल्ट लावला नसलेल्या कारचालकांना अडविण्यात व्यस्त होते अशी माहिती अहवालात देण्यात आली. यावरून न्यायालयाने शासनाची चांगलीच खरडपट्टी काढली. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते अनिल आग्रे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. जुना पारडी नाका ते प्रजापती चौक, जुना पारडी नाका ते सोनबानगर, जुना पारडी नाका ते चिखली चौक व जुना पारडी नाका ते उमिया गेट हे रोड १० आॅगस्ट २०१५ पासून ‘नो पार्किंग झोन’ जाहीर करण्यात आले आहेत. परंतु, कोणीही या आदेशाचे पालन करीत नसून रोडवर सर्रास वाहने उभी ठेवली जातात. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)