शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भारत टी-२० विश्वचषक जिंकणार की नाही? नागपूरचे प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ नरेंद्र बुंदे यांचे भाकीत काय सांगते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 20:10 IST

Nagpur : क्रिकेट आणि क्रिकेटपटूंबद्दल अचूक भविष्य वर्तविणारे बुंदे यांचे अनेक अंदाज आतापर्यंत खरे ठरले. त्यांच्याकडून टिप्स मिळवीत अनेक सेलिब्रिटी क्रिकेटर आणि संघ प्रशासकांनी यश मिळविले आहे.

किशोर बागडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०२४ चा विश्वविजेता भारतीय संघ यंदा सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकणार असून, घरच्या मैदानावर, यजमान संघ म्हणून आणि विशेषत: रविवारच्या दिवशी भारत विश्वविजेता बनू शकत नाही, ही सर्व मिथडके तोडून ऐतिहासिक जेतेपद मिळवून तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा मान मिळेल, असे भाकीत नागपूरचे प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ नरेंद्र बुंदे यांनी केले आहे.

क्रिकेट आणि क्रिकेटपटूंबद्दल अचूक भविष्य वर्तविणारे बुंदे यांचे अनेक अंदाज आतापर्यंत खरे ठरले. त्यांच्याकडून टिप्स मिळवीत अनेक सेलिब्रिटी क्रिकेटर आणि संघ प्रशासकांनी यश मिळविले आहे. ‘लोकमत’शी बोलताना आज, रविवारी खेळल्या जाणऱ्या भारत-न्यूझीलंड यांच्यातील फायनलबद्दल त्यांनी मत मांडले. ते म्हणाले, ‘टी-२० विश्वचषक २०२६ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात जिंकण्याचे टीम इंडियाचे योग आहेत. कर्णधार सूर्याच्या कुंडलित गुरू उच्च राशीला आहे तसेच त्याच्या कुंडलीत सूर्य, बुध, शुक्र ही जबरदस्त यश देणारी युती आहे. फायनलच्या दिवशी रविवार आहे व चंद्र तुला राशीला आहे. सूर्याच्या कुंडलीत प्लूटो सोबत भ्रमण करतो आहे. त्यामुळे त्याला नेत्रदीपक कामगिरी करून हा देशाला तिसरा टी-२० विश्वचषक जिंकून देण्याचा जबरदस्त योग आहे.’ बुंदे यांनी भारतीय संघ २००७ आणि २०२४ ला विश्वविजेता बनेल, असे भाकीत वर्तविले होते. दोन्ही वेळा भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकली, हे विशेष.

नरेंद्र बुंदे यांची खरी ठरलेली भाकिते अशी.....

  • विराट आणि अनुष्का शर्मा लवकरच विवाहबद्ध होणार, हे भाकीत खरे ठरले.
  • विराट कोहली भारताचा नंबर वन ब्रॅंडदूत बनणार! विराट खेळातील सर्वांत मोठा ब्रॅंडदूत ठरला आहे. २०२० ला तो ७१ शतकांवर थांबला होता. त्यानंतर त्याने लागोपाठ शतके ठोकली.
  • २०१७ ला केलेल्या भाकितानुसार विराट आपल्या कारकिर्दीत तीन वेळा विश्विजेतेपद पटकाविणार! विराटने स्वत:च्या नेतृत्वात १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला. २०२४ च्या विश्वचषक विजेतेपदात सर्वाधिक योगदान दिले. त्याच्या उपस्थितीत तिसरे जेतेपद लवकरच मिळू शकेल.
English
हिंदी सारांश
Web Title : India to Win T20 World Cup? Astrologer's Prediction Revealed

Web Summary : Astrologer Narendra Bunde predicts India will win the T20 World Cup for the third time, overcoming traditional obstacles. He cites Suryakumar Yadav's leadership and favorable planetary alignments. Bunde's past predictions about Virat Kohli have also proven accurate.
टॅग्स :World Cup Twenty20विश्वचषक ट्वेन्टी-२०cricket off the fieldऑफ द फिल्डAstrologyफलज्योतिषnagpurनागपूर