शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

रेल्वे तिकीट ऑनलाईन बुक करणाऱ्यांना ‘सर्व्हिस चार्ज’ कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 12:26 PM

इंडियन रेल्वे कॅटरींग अँड टुरीझम कार्पोरेशनने जारी (आयआरसीटीसी) जारी केलेल्या आदेशानुसार प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी स्लिपर क्लाससाठी १५ रुपये प्रति तिकीट आणि एसी क्लाससाठी ३० रुपये प्रति तिकीट सेवा शुल्क वसूल करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देझेडआरयुसीसी सदस्यांनी केला विरोधऑनलाईन तिकीट काढणाऱ्यांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे मंत्रालयाने रविवारपासून ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना पुन्हा सर्व्हिस चार्ज लावणे सुरू केले आहे. मध्य रेल्वेच्या झेडआरयुसीसी सदस्यांनी ही प्रवाशांची लूट असल्याचे सांगून त्यास विरोध दर्शविला आहे. आधी सेवा द्या मग शुल्क आकारा, रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेची १०० टक्के हमी दिल्यास प्रवाशी स्वत: सर्व्हिस चार्ज देतील, असे सदस्यांचे मत असून प्रवाशांची ही लूट थांबविण्याची मागणी केली आहे.इंडियन रेल्वे कॅटरींग अँड टुरीझम कार्पोरेशनने जारी (आयआरसीटीसी) जारी केलेल्या आदेशानुसार प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी स्लिपर क्लाससाठी १५ रुपये प्रति तिकीट आणि एसी क्लाससाठी ३० रुपये प्रति तिकीट सेवा शुल्क वसूल करण्यात येणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे सेवा शुल्क आकारल्यानंतर जीएसटीही प्रवाशांकडून वसूल करण्यात येणार आहे. तज्ज्ञांच्या मते ही प्रवाशांची लूट आहे. सेवा शुल्काच्या नावावर आयआरसीटीसी एका आरक्षणाच्या तिकीटावर एका प्रवाशाच्या जनरल तिकिटाचा खर्च वसूल करीत आहे. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी ३ वर्षांपुर्वी सेवाशुल्क बंद करण्यात आले होते. यापूर्वी आयआरसीटीसीतर्फे स्लिपर क्लास ई तिकिटासाठी २० रुपये, एसी क्लाससाठी ४० रुपये सेवाशुल्क वसूल करण्यात येत होते. आता आयआरसीटीसीने ऑनलाईन तिकीट घेणाऱ्या प्रवाशांकडून सेवा शुल्कास मंजुरी दिली आहे. सेवा शुल्क माफ करण्याची योजना काही दिवसांसाठीच होती,असे रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे.

प्रवाशांवरील बोझा वाढणार‘ई तिकीट काढल्यामुळे प्रवाशांवर बोझा पडणार आहे. प्रवाशांना सवय लावण्यासाठी सेवा शुल्क आकारण्यात येत नव्हते. प्रवाशांना ई तिकिटाची सवय लागल्यानंतर सेवा शुल्क सुरु करण्यात आले आहे. याशिवाय जीएसटी वेगळा वसूल करण्यात येईल. रेल्वे सेवा देत नसून व्यापार करीत आहे. यामुळे प्रवाशांवरील बोझा वाढणार आहे.’-प्रवीण डबली, माजी झेडआरयूसीसी सदस्य, दपूम रेल्वे

सेवा शुल्क आकारणे चुकीचे‘रेल्वेकडून आरक्षण शुल्क, सुपरफास्ट रेल्वेचा चार्ज आकारण्यात येत असताना सर्व्हिस चार्ज आकारणे चुकीचे आहे. शासन रेल्वेचे खाजगीकरण करू पाहत आहे. कोचचे टपकणारे छत, घाण चादर, उशी, निकृष्ट भोजन मिळत असताना सर्व्हिस चार्ज आकारणे चुकीचे आहे. सर्व्हिस चार्ज घेतल्यानंतर कन्फर्म तिकिटाची हमी रेल्वे घेणार आहे काय, हा प्रश्न आहे.’-बसंत कुमार शुक्ला, झेडआरयूसीसी सदस्य, मध्य रेल्वे

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे