शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

पक्षपात कशासाठी ?

By admin | Updated: February 7, 2015 01:59 IST

‘नो पार्किंग’मधील वाहने उचलण्याच्या पन्नास टक्के नियमांची अंमलबजावणीच होत नाही. कारवाई करताना मोठ्या प्रमाणावर पक्षपात केला जात आहे,

सुमेध वाघमारे नागपूर‘नो पार्किंग’मधील वाहने उचलण्याच्या पन्नास टक्के नियमांची अंमलबजावणीच होत नाही. कारवाई करताना मोठ्या प्रमाणावर पक्षपात केला जात आहे, हे साक्षात वास्तव एका पाहणीत आढळून आले. कुठल्याही रस्त्यावरील दुचाकी वाहने सर्रास उचलून नेली जातात. वाहतुकीला अडथळा असल्याचे सांगून ही कारवाई केली जाते. सीताबर्डीच्या मोदी नंबर ३ मध्ये दोन्ही भागात वाहन उभी करण्यास मनाई आहे, तसा फलकही लावण्यात आला आहे. परंतु दुकाने, हॉटेल्ससमोरील पहिल्या रांगेतील वाहने उचलली जात नाहीत, परंतु याच गल्लीतील इतर ठिकाणच्या पहिल्या रांगेतील वाहने उचलतात. दुकानासमोर सुरक्षा रक्षक असेलतर डबल पार्किंग लावली तर त्याला हात लावण्याची कुणाची हिंमत होत नाही. विशेष म्हणजे, ‘नो पार्किंग’मध्ये लावलेल्या गाड्या उचलण्यासाठी जे नियम आहेत त्यातील पन्नास टक्केही नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणे ही जनहिताचीच बाब आहे. मात्र, अनधिकृत पार्किंगच्या नावाखाली दुचाकी वाहने उचलण्याच्या कारवाईवर ‘लोकमत’चमून लक्ष ठेवले असता यात भेदभाव केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पार्किंगसाठी जागा नसतानाही इमारतींना परवानगी!कोणत्याही इमारतीचा आराखडा मंजूर करताना त्या इमारतीला पार्किंग आहे की नाही, हे पाहिल्यानंतरच त्या इमारतीला परवानगी देण्याचे काम महापालिकेचे आहे. असे असतानाही सीताबर्डीसारख्या परिसरात बोटावर मोजण्याइतक्या इमारती सोडल्यास कुणाचकडे पार्किंगची जागा नाही. बहुसंख्य वाहने रस्त्यावर उभी केली जातात.