‘एसबीएल’च्या मालकावर कुणाचा वरदहस्त, अद्यापही ‘आऊट ऑफ रिच’

By योगेश पांडे | Updated: March 5, 2026 20:37 IST2026-03-05T20:36:32+5:302026-03-05T20:37:21+5:30

Nagpur : शोधासाठी तीन पथके रवाना, पोलिसांचे हात रिकामेच : कामगारांच्या जखमांवर आणखी किती मीठ चोळणार ?

Whose hand is on the owner of 'SBL', still 'out of reach' | ‘एसबीएल’च्या मालकावर कुणाचा वरदहस्त, अद्यापही ‘आऊट ऑफ रिच’

Whose hand is on the owner of 'SBL', still 'out of reach'

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील ‘एसबीएल एनर्जी लिमिटेड’मध्ये झालेल्या स्फोटात १९ कामगारांचे बळी गेल्यानंतरदेखील कंपनीचा मालक संजय चौधरी व आलोक चौधरी फरारच आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे सक्षम व तंत्रज्ञानयुक्त गुप्तचर यंत्रणा असल्याचा दावा करणाऱ्या नागपूर ग्रामीण पोलिसांच्या हाती त्याचा अद्याप काहीही सुगावा लागलेला नाही. त्याच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आली असून त्याला ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

ज्या दिवशी स्फोट झाला त्याच दिवशी संजय चौधरी व आलोक चौधरी छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपुरातून नागपूरच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र गुन्हा दाखल झाल्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती कळताच दोघेही अचानक गायब झाले. कंपनीच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते सायंकाळपर्यंत संपर्कात होते. त्यानंतर त्यांचे फोनदेखील बंद झाले व दोघेही ‘आऊट ऑफ रिच’ झाले. स्फोटाला चार दिवस उलटून गेल्यावरदेखील दोघांविरोधातदेखील कुठलाही सुगावा लागलेला नाही. दोघेही देश सोडून जाण्याची शक्यता असल्याने ‘लुकआऊट’ नोटीस जारी करण्यात आली आहे. शिवाय नागपूर ग्रामीण पोलिसांकडून तीन शोधपथके विविध शहरांमध्ये पाठविण्यात आली आहेत. मात्र अद्यापपर्यंत पोलिसांना कुठलेही यश मिळालेले नाही. ‘एसबीएल’ कंपनीत मध्य भारतातील अनेकांची गुंतवणूक आहे. शिवाय अनेकांचे ‘अर्थपूर्ण’ व्यवहारदेखील चालतात. त्यातूनच कुणीतरी चौधरीला लपण्यासाठी ‘पॅसेज’ दिला असण्याची शक्यता आहे. यासंदर्भात कळमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज काळबांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शोधमोहीम सुरू असल्याचेच सांगितले.

इतर ८ आरोपीदेखील ताब्यात नाहीत

दरम्यान, पोलिसांनी ११ जणांना अटक केली होती. त्यासोबतच गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये केदान पंचपुत्रे, राजू पारधी, रवींद्र पोखरना, श्रवणकुमार, सत्यवती पराशर, अलोक अवधिया, मनोजकुमार प्रसाद, नितीन चंदनमल, अतुल गुप्ता यांचादेखील समावेश होता. हेदेखील अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. यातील अनेक जण कंपनीतील अधिकारी किंवा सूपरवायझर आहेत. मात्र त्यांनादेखील पकडण्यात पोलिसांना यश न आल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘लूकआऊट’चा किती फायदा होणार ?

चौधरी देशाबाहेर पळून जाऊ नये यासाठी ‘लूकआऊट नोटीस’ जारी करण्यात आली आहे. सोबतच चौधरीच्या रायपूर येथील घराचीदेखील झडती घेण्यात आली. मात्र चौधरी हा देशातच कुठेतरी लपला असण्याची दाट शक्यता आहे. चौधरीचे बऱ्याच राजकीय नेत्यांसोबतचदेखील विशेष ‘कनेक्शन’ आहेत.

Web Title : एसबीएल का मालिक अभी भी फरार; राजनीतिक संबंध संदिग्ध।

Web Summary : एसबीएल एनर्जी का मालिक, संजय चौधरी, फैक्ट्री विस्फोट के बाद से फरार है। लुकआउट नोटिस और तलाशी के बावजूद, पुलिस को वह या अन्य अधिकारी नहीं मिले हैं। राजनीतिक संबंधों पर उसकी मदद करने का संदेह है।

Web Title : SBL Owner Still at Large; Political Connections Suspected.

Web Summary : SBL Energy owner, Sanjay Choudhary, remains absconding after factory blast. Despite a lookout notice and searches, police haven't found him or other officials. Political connections are suspected to be aiding his evasion.