शहरं
Join us  
Trending Stories
1
TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
2
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
3
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
4
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
5
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
6
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
7
बारामतीत जय पवार यांनी भरवला जनता दरबार, नागरिकांची गर्दी, समस्या सोडवण्यावर दिला भर
8
Top Marathi News Live: नितीश कुमारांचा मुलगा बनला मंत्री, निशांत कुमार यांनी घेतली शपथ
9
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
10
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
11
Video - हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा
12
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
13
Mangala Thoke : शिकण्याची जिद्द! दिवसा घरकाम, रात्री अभ्यास; ६८ वर्षांच्या आजींनी ६०% गुणांसह पास केली बारावी
14
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
15
अमेरिकेत विमानाला अपघात, लँडिंग करताना हायवेवरील ट्रकला धडकलं आणि...; व्हिडीओ व्हायरल!
16
Samudrik Shastra: चेहरा बघून ओळखा स्वभाव! गोल, चौकोनी की अंडाकृती? काय सांगतो तुमचा 'फेस शेप'?
17
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
18
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
19
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
20
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
Daily Top 2Weekly Top 5

तरुण मुलं गेल्याने अख्ख गाव गहिवरलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:22 IST

अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : गिरड (जिल्हा वर्धा) येथील दर्ग्यात दर्शन घेऊन परत येत असतानाचा भरधाव टिप्परने ...

अभय लांजेवार

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : गिरड (जिल्हा वर्धा) येथील दर्ग्यात दर्शन घेऊन परत येत असतानाचा भरधाव टिप्परने ऑटाेला धडक दिल्याने शांतीनगर, नागपूर येथील तिघांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. ३) सायंकाळी उमरेड परिसरात घडली. या घटनेला २४ तास हाेते न हाेते ताेच उमरेड तालुक्यातील हिवरा-हिवरी येथील चाैघांवर काळाने झडप घातली. येथील नऊ जण ‘गणपती बाप्पा मोरया’चा जल्लोष करत बाेलेराेने गणपतीपुळेच्या दिशेने निघाले हाेते. त्यांच्या वाहनाला हिंगणघाट (जिल्हा वर्धा) येथे साेमवारी (दि. ४) रात्री अपघात झाला आणि चाैघांना काळाने हिरावून नेले. तरुण मुले गेल्याने अख्खं गाव गहिवरलं हाेतं. गावात दिवसभर स्मशानशांतता हाेती.

एकूण १,५५० लाेकसंख्या असलेल्या हिवरा-हिवरी येथील मोहन राजेंद्र माेंढे (२२), सूरज जयवंत पाल (२०), आदेश हरिभाऊ कोल्हे (१७), शैलेश पंढरी गिरसावळे (२६), शुभम प्रमोद पाल (२२), समीर अरुण माेंढे (१७), भूषण राजेंद्र कोल्हे (२४), प्रणय दिवाकर कोल्हे (१७) व चैतन्य प्रमोद कोल्हे (१२) साेमवारी रात्री देवदर्शनासाठी बाेलेराेने गणपतीपुळे येथे जायला निघाले. रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास त्यांच्या वाहनाला हिंगणघाट येथे अपघात झाला. त्यात मोहन माेंढे, सूरज पाल, आदेश कोल्हे व शैलेश गिरसावळे या चाैघांचा मृत्यू झाला तर इतर गंभीर जखमी झाल्याची माहिती कुटुंबीयांसह ग्रामस्थांना कळली आणि गावात शाेककळा पसरली.

रडारड, हुंदक्यात ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. काही तासांपूर्वी हसतखेळत प्रवासाला सुरुवात करणाऱ्या या तरुणांच्या निधनाची वार्ता दोन तासांतच कानावर यावी, यावर कुणाचा विश्वास बसेना. हे शल्य, वेदना असह्य करणाऱ्या करणाऱ्या व हादरून साेडणाऱ्या हाेत्या. कारण, यात कुणी मुलगा तर कुणी भाऊ व मित्र कायमचा गमावला हाेता. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या या मुलांचा अपघात जाणं सर्वांनाच गहिवरून साेडणारं हाेतं. ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत प्रवासाला सुरुवात करणाऱ्यांपैकी चाैघांच्या आयुष्याचा हा शेवटचा प्रवास ठरला.

....

सामान्य घरातील आधार गेला

माेहनच्या बहिणीचे २७ नाेव्हेंबर २०२० राेजी लग्न झाले. ताे मजुरी करून वृद्ध आई-वडिलांना आर्थिक व मानसिक आधार द्यायचा. आईच्या निधनानंतर सूरजने वडिलांना हिंमत देत आपल्या चार एकर शेतात कष्ट करत वडिलांना मदत करायला सुरुवात केली हाेती. त्याची समीक्षा नावाची धाकटी बहीण भावाविना पाेरकी झाली. अभ्यासात हुशार असलेला आदेश उमरेड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीत (विज्ञान) शिकायचा. त्याचे आई-वडील पाच एकर शेतीवर उदरनिर्वाह करतात. शैलेश वाहनचालक हाेता. त्याचा माेठा भाऊ ऑटाे चालवून उदरनिर्वाह करताे. त्याच्याकडे चार एकर शेती आहे. चाैघेही अविवाहित असून, कुटुंबाचा आधार हाेते.

...

सामूहिक अंत्यसंस्कार

हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मोहन माेंढे, सूरज पाल, आदेश कोल्हे व शैलेश गिरसावळे या चाैघांचे पार्थिव हिवरा-हिवरी येथे आणले. सायंकाळी स्थानिक स्मशानभूमीत चाैघांच्या पार्थिवावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत गावातील प्रत्येक जण व परिसरातील गावांमधील नागरिक सहभाग झाले हाेते. ग्रामस्थांनी जड अंत:करणाने या चाैघांनाही अखेरचा निराेप दिला.