शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
4
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
5
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
6
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
7
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
8
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
9
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
10
भोंदू खरातसोबत कथित व्यवहार प्रकरण; रुपाली चाकणकर यांची साडेआठ तास ईडी चौकशी
11
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
12
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
13
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
14
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
15
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
16
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
17
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
18
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
19
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
20
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
Daily Top 2Weekly Top 5

विजयरथ कोण रोखणार?

By admin | Updated: June 13, 2014 01:22 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांना कौल देणारा मतदारसंघ म्हणून काटोल विधानसभा मतदारसंघाची आगळीवेगळी अशी ओळख आहे. २००९ च्या निवडणुकीत ७ हजार ९५ मतांची

शिवसेना बनविणार रणनीती : अपक्ष उमेदवार वाढविणार डोकेदुखी
गणेश खवसे - नागपूर
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांना कौल देणारा मतदारसंघ म्हणून काटोल विधानसभा मतदारसंघाची आगळीवेगळी अशी ओळख आहे. २००९ च्या निवडणुकीत ७ हजार ९५ मतांची शिवसेनेला आघाडी देणाऱ्या मतदारसंघात यावेळी तब्बल ३८ हजार ४४६ मतांची ‘लीड’ मिळाली. या मतांमुळे आगामी विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढण्याची तयारी अनेकांनी चालविली आहे. ऐनवेळी कुणाला उमेदवारी दिली जाते, त्यावर येथील विजयरथाला ‘ब्रेक’ मिळतो की काय, ते निश्चित होईल.
अनिल देशमुख हे १९९५ पासून काटोल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. १९९५ मध्ये ते अपक्ष म्हणून पहिल्यांदा विधानसभेवर गेले. त्यानंतर १९९९, २००४ आणि २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवीत ते विजयी झाले. या विधानसभेचा इतिहास पाहिला असता काँग्रेस उमेदवाराला येथील मतदारांनी निवडून दिले. १९६२ आणि १९७२ मध्ये शंकरराव गेडाम, १९७८ मध्ये मुकुंदराव मानकर, १९८० मध्ये डॉ. श्रीकांत जिचकार, १९८५ आणि १९९० मध्ये सुनील शिंदे हे येथून विजयी झाले. दरम्यानच्या काळात केवळ १९६७ मध्ये अपक्ष उमेदवार जे. एस. चांडक हे विजयी झाले.
आगामी विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या तरी दुसरी इच्छुक उमेदवार नाही. देशमुख हे यापूर्वीच्या चार निवडणुकीत विजयी झाले असून, पाचव्या ‘टर्म’साठी ते सज्ज झाले आहेत.
या विधानसभेत युतीची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. शिवसेनेकडून राजू हरणे हे इच्छुक असून, त्यांनी त्यादृष्टीने तयारी चालविली आहे. माजी खासदार प्रकाश जाधव यांच्यासोबतच यापूर्वी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणाऱ्या अ‍ॅड. नीलेश हेलोंडे यांचेही नाव शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये आहे. तर मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेचे सत्ता पक्षनेते उकेश चव्हाण यांच्याही नावाची चर्चा केली जात आहे.
आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसकडून अभिजित गुप्ता यांचे नाव समोर आले आहे. तर माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्या नावाचीही काटोलमध्ये जोरदार चर्चा आहे. शेतकरी कामगार पक्षाकडून राहुल देशमुख हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
याव्यतिरिक्त मनोज खळतकर हे निवडणूक लढविण्यास तयार असून, अपक्ष उमेदवारांचीही गर्दी या मतदारसंघात वाढणार आहे. अपक्ष उमेदवार हे प्रमुख पक्षाच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरू शकतात.
या विधानसभा मतदारसंघाचा विचार करता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत येथील मतदारांचा कौल वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांकडे राहिला आहे. अर्थात लोकसभेत शिवसेनेला मताधिक्य वाढवून देण्यात मदत करणारे येथील मतदार विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पसंती दर्शवितात, असा मागील काही निवडणुकीचा अनुभव आहे. या निवडणुकीतही हेच समीकरण राहील काय, हे सांगणे सध्या तरी अवघड आहे.
शिवसेनेच्या बाबतीत विचार करावयाचा झाल्यास १९९९, २००४ आणि २००९ या तीन विधानसभा निवडणुकीसाठी काटोलमधून उमेदवार दिला. १९९९ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर, २००४ मध्ये दुसऱ्या तर २००९ मध्ये ‘रिडालोस’चे चरणसिंग ठाकूर यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतल्याने, शिवसेनेच्या किरण पांडव हे तिसऱ्या क्रमांकावर गेले. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांमध्ये ४ हजार ५६८ मतांचा फरक होता. बंडखोर, अपक्षांवरच खरे तर काटोल विधानसभा मतदारसंघात मतांची बेरीज-वजाबाकी केली जाऊ शकते. त्यामुळे सध्या तरी अशा इच्छुक उमेदवारांवर पक्षाने नजर रोखून धरण्याची वेळ आली आहे, अन्यथा ते डोकेदुखी वाढतील.