शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
3
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
4
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
5
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
6
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
7
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
8
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
9
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
10
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
11
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
12
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
13
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
14
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
15
मराठा समाजासाठी आमच्या एवढे काम कोणी केले नाही काेणतीही याेजना बंद नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
16
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
17
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
18
भारत-नेदरलँड्स यांच्यात १७ करारांवर स्वाक्षऱ्या; पंतप्रधान मोदी-रॉब जेटेन यांच्यात धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये मंथनासाठी कुणी पुढाकार घेईना!

By admin | Updated: May 20, 2014 00:52 IST

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसह राज्यातही सोमवारी विचारमंथन झाले. नागपुरात मात्र अशा मंथनासाठी कुणी पुढाकार

 अध्यक्षांचा राजीनामा : मंत्री, पदाधिकार्‍यांची दडी

नागपूर : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसह राज्यातही सोमवारी विचारमंथन झाले. नागपुरात मात्र अशा मंथनासाठी कुणी पुढाकार घ्यायलाही तयार नाही. शहर अध्यक्ष विकास ठाकरे व जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. मात्र, अध्यक्ष सोडले तर नागपुरात मंत्री, माजी मंत्री, प्रदेश पदाधिकार्‍यांची मोठी फौज असताना, कुणीही बैठक घेण्यासाठी समोर आलेले नाहीत. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच काँग्रेसमधील उत्साह मावळला होता. लोकसभा निवडणुकीत ज्या नेत्यांवर कुठलीही जबाबदारी नव्हती, असे नेते पराभवासाठी आपण काहीच जबाबदार नाही, अशा आविर्भावात वावरत होते. खासगीत बोलताना प्रभारींच्या कार्यशैलीवर खापर फोडत होते. निकालाच्या तीन दिवसानंतरही तीच स्थिती आहे. काँग्रेसचे पदाधिकारी एकमेकांना सल्ला देण्यात व्यस्त आहेत. प्रत्येक जणाच्या चर्चेत ‘असे करायला हवे होते, तसे व्हायला हवे होते’, असेच सल्ले ऐकायला मिळत आहेत. मात्र, आपण स्वत: पक्षासाठी, पक्ष कार्यकर्त्यांसाठी काय केले, यावर आत्मपरीक्षण करायला कुणीच तयार नाही. कार्यकर्ते शहर पदाधिकारी विकास ठाकरे यांना बैठक घेण्यासाठी आग्रह करीत आहेत. मात्र, पदाचा राजीनामा दिला असल्यामुळे कोणत्या अधिकारात बैठक घ्यायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. माजी खा. विलास मुत्तेमवार, रोहयो मंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, आ. दीनानाथ पडोळे, प्रदेश सचिव जयप्रकाश गुप्ता या नेत्यांपैकी कुणीही पुढाकार घेण्यास तयार नाहीत. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. तीन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका आहे. सहाही मतदारसंघात भाजपची आघाडी पाहता काँग्रेसपुढे मोठे संकट आहे. अशात आता पराभव विसरून नव्याने मोट बांधली नाही तर विधानसभाही हातून जाईल, अशी स्थिती आहे. मात्र, नेत्यांनी दडी मारल्यामुळे कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे. (प्रतिनिधी)