Who is the master mind behind sambhaji bhide? Ajit Pawar's attack | संभाजी भिडेंमागचा मास्टर माईंड कोण?; अजित पवारांचा हल्लाबोल
संभाजी भिडेंमागचा मास्टर माईंड कोण?; अजित पवारांचा हल्लाबोल

नागपूर - भिडे गुरुजी म्हणतात संतांपेक्षा मनु श्रेष्ट आहे, हे धाडस कसे होते, त्यांच्या  मागचा मास्टर माईंड कोण आहे? कुठल्या दिशेने कारभार सुरु आहे असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केला. नागपूर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर छगन भुजबळसह अन्य दिग्गज नेते उपस्थित होते. नागपूरात सुरु असेलल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात भाजपावर टीका करतानाच कार्यकर्त्यांना निवडणूकीच्या कामाला लागायचा सूचक इशाराही अजित पवार यांनी यावेळी दिला.  

अजित पवार यांच्या भाषणातील मुद्दे - 

  • संविधान बचावच्या ठरावासह पाच ठराव मांडले जात आहेत  : अजित पवार
  • भाजपा संविधानाला नख लावू पाहत आहे : अजित पवार
  • संविधान बदलण्यासाठी सरसावणारे हात कलम करू : अजित पवार  
  • रक्त सांडले तरी संविधान बचावाची लढाई लढू : अजित पवार 
  • गुरुजी म्हणतात संतांपेक्षा मनू श्रेष्ट आहे, हे धाडस कसे होते : अजित पवार 
  • भिडेंच्या मागचा मास्टर माईंड कोण आहे ? कुठल्या दिशेने कारभार सुरु आहे : अजित पवार 
  • कुठल्याही क्षणी लोकसभा लागेल, कामाला लागा : अजित पवार 
  • मनुवादी विचार डोके वर काढू पाहत आहे : अजित पवार  

Web Title: Who is the master mind behind sambhaji bhide? Ajit Pawar's attack
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.