शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
4
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
7
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
8
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
9
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
10
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
11
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
12
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
13
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
14
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
15
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
16
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
17
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
18
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
19
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
20
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संविधानाचा ड्राफ्ट टाईप करणारा ऐतिहासिक टाईपराईटर कुठे आहे?

By आनंद डेकाटे | Updated: November 26, 2025 17:00 IST

Nagpur : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. त्या काळात देशाला योग्य असे ‘संविधान’ देण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. त्या काळात देशाला योग्य असे ‘संविधान’ देण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. हे संविधान ज्या टायपरायटरवर टाइप केले गेले, तो टायपरायटर सध्या नागपुरातील चिचोली येथील शांतिवनमधील डॉ. बाबासाहेबांच्या वस्तु संग्रहालयात जपून ठेवण्यात आला आहे. याशिवाय बाबासाहेबांशी संबंधित इतर अनेक वस्तुही येथे संग्रहित आहे. या सर्वांचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक शांतिवनला भेट देतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे ‘संविधान’ दिल्लीमध्ये लिहिले आणि त्या काळातील टायपरायटरवर स्वतःच्या हाताने टाइप केले. देश घडवण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी ‘संविधान’ लिहून केले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ‘संविधान’ पूर्ण झाले आणि २६ जानेवारी १९५० या गणतंत्रदिनी डॉ. बाबासाहेबांनी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना देशाचे ‘संविधान’ सुपूर्द केले. त्या वेळी पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादुर शास्त्री, वल्लभभाई पटेल आदी थोर नेते उपस्थित होते. अतिशय परिश्रमाने हे संविधान लिहिले होते. त्यामुळे त्या ऐतिहासिक संविधानाचा मुख्य ड्राफ्ट ज्या टाईपराईटवर तयार झाला तो आपल्या नागपुरात सुरक्षित असून इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. 

चिचोली शांतिवनाचा कार्यभार पाहणारे संजय पाटील यांच्यानुसार  १९९१ साली डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खासगी सचिव नानकचंदजी रत्तू यांनी बाबासाहेबांचे सर्व साहित्य भारतीय बौद्ध परिषदेचे सचिव वामनरावजी गोडबोले यांच्याकडे सुपूर्द केले. गोडबोले यांना दानात मिळालेल्या जमिनीवर शांतिवनची उभारणी करण्यात आली आणि त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कोट, खुर्ची, टोपी, टाय, पेन, कप, बूट, मोजे इत्यादी वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये संविधान टाइप केलेला टायपरायटर विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. येथे दोन टाईपराईटर आहेत. एका टायपरायटरवर ‘देशाचे संविधान’ टाइप करण्यात आले, तर दुसऱ्यावर ‘द बुद्धा अँड हिज धम्मा’ हा ग्रंथ टाइप करण्यात आला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Historic typewriter used to draft Indian Constitution located in Nagpur.

Web Summary : Dr. Ambedkar's Constitution draft typewriter is preserved in Nagpur's Shantiwan museum. It attracts visitors alongside other personal items like coats and books, offering inspiration. Another typewriter typed 'The Buddha and His Dhamma'.
टॅग्स :Constitution Dayसंविधान दिनnagpurनागपूर