शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

कुठून आले मुगलकालीन शिक्के

By admin | Updated: April 23, 2016 03:08 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाच्या संग्रहालयात

नोंदणीच नाही : प्राचीन इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागाच्या बॉक्समध्ये शिक्केनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाच्या संग्रहालयात एका बॉक्समध्ये मुगलकालीन १५ ते १६ बहुमूल्य शिक्के प्राप्त झाले आहे. हे शिक्के कुठून आले, कुणी विभागात आणून ठेवले, याची माहिती आतापर्यंत कुणालाच मिळालेली नाही. मुळात विभागाकडे या शिक्क्यांची नोंदणीच नाही. याशिवाय विभागाकडे या शिक्क्यांचा कुठलाच जुना दस्तावेजही उपलब्ध नाही. यामुळे बहुमूल्य ऐतिहासिक संचित असलेल्या वस्तूंच्या संरक्षणाबाबत विद्यापीठ किती बेजबाबदार आहे, हे देखील उघड झाले आहे. विद्यापीठाचा पुरातत्त्व विभाग आता हे शिक्के आले कुठून याचा शोध घेण्यात लागले आहे. यासंदर्भात कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे म्हणाले, हे शिक्के विभागाच्या संग्रहालयात सापडले. हा बॉक्स अनेक वर्षापासून उघडून पाहण्यात आला नव्हता. तो बॉक्स सुरक्षित स्थानी ठेवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी विभागाच्या एका कर्मचाऱ्याला या बॉक्समध्ये एक पॉकेट मिळाले. यात शिक्के असल्याचे कळल्यावर त्याची सूचना विभाग प्रमुखांना देण्यात आली. विभागात याशिवायही अनेक बहुमूल्य सांस्कृतिक, ऐतिहासिक संचित असलेल्या वस्तू आहेत. सध्या या वस्तू विभागाजवळ नाहीत. काही वर्षांपूर्वी विभागाची स्वत:ची स्वतंत्र इमारत नव्हती. त्यामुळे विभागाला एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत स्थानांतरित करण्यात येत होते. विभागाकडे ऐतिहासिक पांडुलिपी, मूर्ती आदींचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याचे मूल्य कोट्यवधींचे आहे. वस्तूंची किमान नोंदणी आणि दस्तावेज का नाही? विभागाच्या लहान संग्रहालयात शिक्के सापडल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. हे संग्रहालय छोट्या आकाराचे आहे. त्यामुळे कमी जागेच्या या संग्रहालयात शिक्के ठेवलेल्या बॉक्सकडे आतापर्यंत कुणाचीही नजर का गेली नाही. काही दिवसांपूर्वी एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संग्रहालय सर्वांसाठी खुले करण्यात आले होते. त्यानंतर शिक्क्यांची माहिती मिळाल्यावर या प्रकरणाची चौकशी का करण्यात आली नाही. हे शिक्के आतापर्यंत कुणाच्याही माहितीशिवाय कुठे होते? याचीही चौकशी करण्यात आली नाही. आता अचानक शिक्के सापडल्यावर शिक्के कुठे होते? ते येथे कसे आले? कुणी आणले? याची माहिती का घेण्यात आली नाही. सूत्रांच्या माहितीप्रमाणे शिक्के फार पूर्वी गायब झाले असावे. वाकाटक काळातील शिक्के गायब झाल्याचे प्रकरण समोर आल्यावर त्यावर बराच वाद झाला. हा वाद पाहता कुणीतरी हे शिक्के विभागात आणून ठेवले. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासन मात्र काहीही बोलायला तयार नाही.