शहरं
Join us  
Trending Stories
1
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
2
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
3
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
4
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
5
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
6
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
7
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
8
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
9
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
10
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
11
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
12
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
13
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
14
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
15
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
16
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
17
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
18
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
19
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
20
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कधी होणार चित्रनगरी ?

By admin | Updated: November 22, 2014 02:21 IST

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. केवळ नागरी समस्यांचाच विचार न करता नागरिकांच्या उन्नयनाचा आणि त्यांचे ...

राजेश पाणूरकर नागपूर महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. केवळ नागरी समस्यांचाच विचार न करता नागरिकांच्या उन्नयनाचा आणि त्यांचे राहणीमान उंचाविण्यासाठी हे राज्य प्रयत्न करणारे आहे, असा प्रचार केला जातो. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्राची स्वत:ची ओळख असणारी संस्कृती आहे. ही भूमी आध्यात्मिक परंपरेची आणि कलांवर प्रेम करणाऱ्या संवेदनशील नागरिकांची आहे. त्यामुळेच कदाचित शासनाला राज्याचे सांस्कृतिक धोरण तयार करण्याची गरज वाटली. पण संस्कृतीबाबत शासनाने अद्यापही गांभीर्य दाखविले नाही. सांस्कृतिक धोरणात नागपूर-विदर्भाची बाजू पडतीच आहे. त्यात नागपुरात चित्रनगरीची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली पण सांस्कृतिक धोरणाचीच पायमल्ली सुरू असताना चित्रनगरी (फिल्मसिटी)ची निर्मिती हा गेल्या पाच वर्षात केवळ फार्सच ठरला आहे. सांस्कृतिक धोरण तयार करताना विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समितीत समावेश करण्यात आला. समितीने सांस्कृतिक धोरण तयार केले. यशवंतराव चव्हाण यांचे सांस्कृतिक महाराष्ट्र निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे उद्दिष्ट या धोरणामागे होते. पण या धोरणात विदर्भाच्या वाट्याला नेहमीप्रमाणेच काही आले नाही. चित्रनगरीची निर्मिती करण्याची घोषणा मात्र नागपूरकरांना सुखावणारी होती. चित्रनगरी झाल्यावर चित्रपटांचे चित्रीकरण येथे होईल आणि त्यानिमित्ताने उद्योगनिर्मितीही होईल, अशी अपेक्षा होती. चित्रपटनिर्मितीत आता नागपूरही मागे राहिलेले नाही. पण सांस्कृतिक धोरण तयार झाल्यावर गेल्या चार वर्षात शासनातर्फे धोरणाच्या अंमलबजावणीबाबत आनंदीआनंदच आहे.कुठलाच ठोस निर्णय घेण्यात शासन पूर्णपणे अपयशी ठरले. सांस्कृतिक मंत्री विदर्भाचे असताना विदर्भवासीयांच्या अपेक्षांना सांस्कृतिक क्षेत्रातही निराशाच हाती आली. हा विभाग मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येतो असे सांगून सांस्कृतिक मंत्र्यांनी पळवाट शोधली. गेल्या तीन वर्षात राज्य सरकार छोटीशीही तरतूद करू शकले नाही. लोकप्रतिनिधींच्या सांस्कृतिक शिक्षणावर मात्र आठ लाख रुपये खर्च करण्यात आले. याशिवाय एक गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. याशिवाय शासकीय स्तरावर धोरणाचा प्रारंभच करण्यात आला नाही. नागपूरच्या चित्रनगरीसाठी १० कोटीची तरतूद करण्यात येईल, अशा वल्गना, आश्वासनांनी विदर्भवासीयांच्या मागणीला खो देण्याचा प्रयत्न झाला. गेल्या दोन वर्षात तर समितीच्या आढावा बैठकाही झाल्याच नाहीत. समिती सदस्यच या धोरणाबाबत अनभिज्ञ आहे. नव्या सरकारने चित्रनगरीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सांस्कृतिक क्षेत्रातून करण्यात येत आहे.