दारू देण्यास नकार दिल्याने थेट चाकूनेच केला वार

By योगेश पांडे | Published: March 9, 2024 04:06 PM2024-03-09T16:06:09+5:302024-03-09T16:06:31+5:30

विजय चंदन उज्जैनवार (४२, चंद्रपूर) असे जखमीचे नाव आहे. ते त्यांच्या ईमामवाडा निवासी नातेवाईकांकडे पाहुणचारासाठी आले होते.

When he refused to give alcohol, he stabbed him directly with a knife | दारू देण्यास नकार दिल्याने थेट चाकूनेच केला वार

दारू देण्यास नकार दिल्याने थेट चाकूनेच केला वार

नागपूर : चंद्रपूरहून नातेवाईकांकडे पाहुणचारासाठी आलेल्या व्यक्तीने दारू न दिल्याने परिसरातीलच एका आरोपीने थेट चाकूने वार करत जीवच घेण्याचा प्रयत्न केला. ईमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

विजय चंदन उज्जैनवार (४२, चंद्रपूर) असे जखमीचे नाव आहे. ते त्यांच्या ईमामवाडा निवासी नातेवाईकांकडे पाहुणचारासाठी आले होते. शुक्रवारी दुपारी त्यांना रजत उर्फ मोनू रामटेके (३०, कुंदनलाल वाचनालयाच्या बाजुला) याने दारु मागितली. विजय यांनी त्याला नकार दिला. यावरून रजत संतापला व त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत त्याने विजय यांना मारहाण केली व अचानक चाकू काढत त्यांचा गळा व कानावर वार केले. यानंतर आरोपी फरार झाला. विजय यांना रक्तबंबाळ अवस्थेत मेडिकल इस्पितळात नेण्यात आले. कविता काडगे यांच्या तक्रारीवरून आरोपी रजतविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक करण्यात आली. ईमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गुन्हेगार वास्तव्याला आहे. काही दिवसांअगोदर जाटतरोडी येथे रेल्वे कर्मचाऱ्याच्या हत्येनंतर गुन्हेगार शेखूच्या दहशतीचा मुद्दा चर्चेला आला होता. पोलीस आयुक्तांनी परिसरात जाऊन गुन्हेगारांवर कडक कारवाईचा इशारादेखील दिला होता. मात्र तरीदेखील अद्यापही तेथे अनेक जणांकडे अनधिकृतपणे शस्त्र असून त्यांची दहशत कायम आहे.

Web Title: When he refused to give alcohol, he stabbed him directly with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.