शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील तरुणाईला झाले तरी काय?

By admin | Updated: July 16, 2015 02:57 IST

बदलत्या काळाप्रमाणे समाजव्यवस्थेतदेखील मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहे.

ज्येष्ठ नागरिकांसोबत गैरवर्तनात वाढ : ‘हेल्प एज इंडिया’ने समोर आणले जळजळीत वास्तवयोगेश पांडे नागपूरबदलत्या काळाप्रमाणे समाजव्यवस्थेतदेखील मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहे. ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन घेऊन उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्याचे दिवस आता मागे पडत चालले आहे. विकासाच्या दिशेने अग्रेसर होत असलेल्या नागपूर शहरातील तरुणाईची वागणूक मात्र विरुद्ध दिशेने सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांशी उर्मट वर्तन करुन अपमान करण्यात तरुणाई सर्वात जास्त आघाडीवर आहेत. ज्येष्ठ नागरिकांशी गैरवर्तन करणाऱ्यांमध्ये ३९ टक्के व्यक्ती या १८ ते २४ या वयोगटातील आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे ‘टीनएजर्स’चे प्रमाणदेखील वाढत असल्याची बाब समोर आली आहे. ‘हेल्प एज इंडिया’ या सामाजिक संस्थेच्या २०१५ च्या अहवालातून हे जळजळीत वास्तव समोर आले आहे.ज्येष्ठांवर होणारा अन्याय व त्यांची छळवणूक यासंदर्भात संस्थेकडून देशभरात सर्वेक्षण करण्यात आले. देशातील २५ ते ४५ वयोगटातील तरुणांशी संवाद साधून दिल्ली, बंगळूरु , मदुराई, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, नागपूर, कानपूर, अहमदाबाद आणि मुंबई या १० शहरांमध्ये सर्वेक्षण केले. यानंतर तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार नागपुरातील ज्येष्ठ नागरिकांशी गैरवर्तन करणाऱ्यांमध्ये १८ ते ३४ या वयोगटातील एकूण ७३.४ टक्के तरुणांचा समावेश आहे. १८ वर्षांखालील ‘टीनएजर्स’चे प्रमाण १९.५ टक्के असून ही बाब नक्कीच चिंतीत करणारी आहे.सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन वाढीसजेष्ठ नागरिकांसोबत घरांमध्ये गैरवर्तन करण्यात येतेच. परंतु सार्वजनिक ठिकाणीदेखील त्यांच्याशी उर्मटपणे बोलून किंवा शिवीगाळ करुन त्यांचा अपमान करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. अहवालानुसार छळवणूक सहन करावी लागणाऱ्या जेष्ठ नागरिकांपैकी ४७.५ जणांना घरातूनच त्रास होतो. तर ३१.५ टक्के जेष्ठ नागरिकांना घराबाहेर पडल्यावरदेखील पावलोपावली अपमानाला सामोरे जावे लागत आहे.एकत्र कुटुंबपद्धती आवश्यकजेष्ठ नागरिकांची होणारी छळवणूक थांबविण्यासाठी एकत्र कुटुंबपद्धती आवश्यक असल्याचे नागपुरातील ९०.७ टक्के तरुणांचे मत आहे. शिवाय कुटुंबातून यासंदर्भात पुढाकार घेऊन जेष्ठ नागरिकांना मानाचे स्थान देण्याची आवश्यकता आहे. ही स्थिती सुधारायची असेल तर जेष्ठांच्या सल्ल्यांना महत्त्व द्यावे असे मत २३.५ टक्के तरुणांनी व्यक्त केले आहे. तर एकत्र जेवण घेतल्याने अनेक समस्या दूर होऊ शकतात असे २२.५ टक्के तरुणांचे मानणे आहे.