काय घडले नागपूर विमानतळावर की पोलीस विभागाने तत्परतेने उभी केली यंत्रणा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 20:04 IST2026-03-18T20:03:46+5:302026-03-18T20:04:42+5:30

Nagpur : नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक हालचाली वाढल्या. एटीसी विभागाला 'शॅडो फिनिक्स' नावाच्या विमानातून इंधन संपल्याचा संदेश मिळाला आणि विमान तडकाफडकी धावपट्टीवर उतरले.

What happened at Nagpur Airport that the police department promptly set up a system? | काय घडले नागपूर विमानतळावर की पोलीस विभागाने तत्परतेने उभी केली यंत्रणा ?

What happened at Nagpur Airport that the police department promptly set up a system?

नागपूर : नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक हालचाली वाढल्या. एटीसी विभागाला 'शॅडो फिनिक्स' नावाच्या विमानातून इंधन संपल्याचा संदेश मिळाला आणि विमान तडकाफडकी धावपट्टीवर उतरले. मात्र, विमान उतरताच ते रिफिलिंगसाठी नव्हे, तर 'हायजॅक' (अपहरण) झाल्याचे समोर आले आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणेची एकच धावपळ उडाली. सुदैवाने, हा कोणत्याही अतिरेकी हल्ल्याचा प्रकार नसून, सुरक्षा दलांच्या सज्जतेची चाचणी घेण्यासाठी आयोजित केलेले 'अँटी-हायजॅक मॉक ड्रिल' होते.

​५ हजार कोटी आणि हेलिकॉप्टरची मागणी !

विमानाचा ताबा मिळवल्यानंतर डमी अतिरेक्यांनी पायलटच्या माध्यमातून संवाद यंत्रणेवर कब्जा मिळवला. त्यांनी ५ हजार कोटी रुपये आणि एका हेलिकॉप्टरची मागणी करत प्रवाशांना ओलीस धरले. या संकटकाळात विमानतळाचे वरिष्ठ संचालक आबिद रुही यांनी तातडीने पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल आणि एरोड्रम समितीशी संपर्क साधला. अवघ्या काही मिनिटांत पोलीस, सीआयएसएफ (CISF), वायुसेना आणि एनडीआरएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विमानतळाचा ताबा घेतला.

​असा पार पडला थरार

विमानतळाच्या सुरक्षा सभागृहात बसून छुप्या कॅमेऱ्यांच्या मदतीने विमानातील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात होती. एकीकडे अतिरेक्यांशी वाटाघाटी सुरू होत्या, तर दुसरीकडे रनवेवर कमांडोजनी वेढा घातला होता. दुपारी २ वाजेच्या सुमारास सीआयएसएफच्या निवडक जवानांनी वेश बदलून विमानात प्रवेश मिळवला आणि अत्यंत चतुराईने प्रवाशांची सुटका करत अतिरेक्यांना जेरबंद केले.

​सज्जतेची यशस्वी चाचणी

देशातील निवडक १२ विमानतळांपैकी नागपूर विमानतळ हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. "अशा प्रकारच्या सरावामुळे आणीबाणीच्या काळात विविध यंत्रणांमधील समन्वय आणि तत्परता तपासण्यास मदत होते," असे संचालक आबिद रुही यांनी स्पष्ट केले. या मोहिमेत मिहान सुरक्षा विभाग, अग्निशमन दल, नागपूर पोलीस, एनडीआरएफ आणि वैद्यकीय पथकांनी सक्रिय सहभाग नोंदवत आपली कार्यक्षमता सिद्ध केली.

Web Title : नागपुर हवाई अड्डे पर अपहरण ड्रिल: पुलिस ने तत्परता से नकली संकट का जवाब दिया

Web Summary : नागपुर हवाई अड्डे पर एक विमान द्वारा ईंधन की कमी की सूचना देने के बाद अपहरण का अभ्यास किया गया। 'आतंकवादियों' ने फिरौती की मांग की, यात्रियों को बंधक बनाया। पुलिस, सीआईएसएफ और एनडीआरएफ ने तुरंत प्रतिक्रिया दी और हवाई अड्डे को सुरक्षित कर लिया। कमांडो ने यात्रियों को बचाया और अपहरणकर्ताओं को पकड़ लिया, जिससे तैयारी की पुष्टि हुई।

Web Title : Nagpur Airport's Anti-Hijack Drill: Police Swiftly Respond to Mock Crisis

Web Summary : Nagpur airport simulated a hijack after a plane reported fuel shortage. 'Terrorists' demanded ransom, holding passengers hostage. Authorities swiftly responded, with police, CISF, and NDRF securing the airport. Commandos rescued passengers and apprehended the hijackers, confirming preparedness.

टॅग्स :nagpurनागपूर