शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा रेड, ऑरेंज, ग्रीन, येलो अलर्ट म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:35 IST

अति जोरदार पाऊस म्हणजे? : अत्याधिक जोरदार पाऊस म्हणजे काय?

सुनील चरपेनागपूर : भारतीय हवामान विभाग हवामानाशी संबंधित इशाऱ्यांसाठी चार वेगवेगळ्या रंगांच्या कोडचा वापर करतात. यामध्ये ऑरेंज, ग्रीन, येलो आणि रेड अशा रंगांचा वापर होतो. हे अलर्ट नेमके कशासाठी वापरले जातात? त्यांचा अर्थ काय?

रेड अलर्ट : जेव्हा एखाद्या भागात अतिमुसळधार, अतिवृष्टी किंवा ढगफुटीचा अंदाज असतो, अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट म्हणजे मोठ्या संकटाची शक्यता. त्यामुळे नागरिकांना घरी राहण्याच्या सूचना दिल्या जातात. पूर, भूस्खलन यासह तत्सम नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्ट जारी केला जातो. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावे व धोकादायक भागात जाऊ नये, असा असतो. कारण नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. त्या भागातील प्रशासनाला आपत्ती निवारणासाठी तयार राहण्याचे संकेत रेड अलर्टमधून मिळतात. एखाद्या जिल्ह्यातील हवामान विभागाच्या निश्चित केलेल्या केंद्रांपैकी बहुतांश केंद्रांच्या परिसरात अत्यंत जोरदार, अति जोरदार किंवा जोरदार पाऊस पडणार असेल तर त्या जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला जातो. प्रत्यक्षात पाऊस घाटमाथ्यावर पडणार असला तरी संपूर्ण जिल्ह्याला रेड अलर्ट दिला जातो.

ऑरेंज अलर्ट : मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट म्हणजे आपत्ती येऊ शकते. नागरिक व प्रशासन सतर्क असावे यासाठी हा अलर्ट दिला जातो. ऑरेंज अलर्टचा अर्थ असा की, अशा भागांमध्ये कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा नागरिकांनाही आवश्यक कामांसाठीच घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या जातात. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. हवामान विभागाने निश्चित केलेल्या केंद्रांपैकी काही केंद्रांच्या परिसरात अत्यंत जोरदार, अति जोरदार किंवा जोरदार पावसाची शक्यता असते, तेव्हा त्या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला जातो.

येलो अलर्ट : हवामान बदलामुळे पुढील काही दिवसांमध्ये संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाल्यास हवामान खात्याकडून अनेक शहरांना येलो अलर्ट दिला जातो. म्हणजेच संबंधित शहरांमध्ये नैसर्गिक संकटाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने सर्वांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या जातात. हवामान विभागाच्या निश्चित केलेल्या केंद्रांपैकी तुरळक केंद्रांच्या परिसरात पाऊस पडणार असेल तर त्या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिला जातो. तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार, अति जोरदार किंवा जोरदार पाऊस होऊ शकतो.

ग्रीन अलर्ट : पावसाळ्यात अनेक भागांमध्ये ग्रीन अलर्ट असतो. याचा अर्थ की, संबंधित शहरांमध्ये पावसाची परिस्थिती सामान्य असेल, त्यावेळी कुठलेही निबंध घालण्याची गरज नसते.

पावसाच्या अंदाजाचे महत्त्वाचे शब्दअति हलका पाऊस - ०.१ ते २.४ मिमी.हलका पाऊस - २.५ ते १५.५ मिमी.मध्यम पाऊस - १५.६ ते ६४.४ मिमी.जोरदार पाऊस - ६४.५ ते ११५.५ मिमी.अति जोरदार पाऊस - ११५.६ ते २०४.४ मिमी.अत्याधिक जोरदार पाऊस - २०४.५ मिमी किंवा त्यापेक्षा जास्त.

अत्याधिक जोरदार पाऊस म्हणजे काय?अत्यंत जोरदार पावसाचा अंदाज म्हणजे त्या जिल्ह्यात २४ तासांत २०४.४ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला किंवा होणार असेल तर त्याला हवामान विभाग अत्याधिक जोरदार पाऊस म्हणजेच 'एक्सट्रीमली हेवी रेन' ही संज्ञा वापरते. या प्रमाणात देशात खूपच कमी ठिकाणी पाऊस होतो. 

अति जोरदार पाऊस म्हणजे?

  • अति जोरदार पाऊस म्हणजे ११५.६ ते २०४.४ मिमी पाऊस. ज्या भागात या दरम्यान पाऊस झाला किंवा होणार आहे, तेथे हवामान विभाग अति जोरदार पावसाचा अंदाज देतो. हवामान विभाग याला अति जोरदार पाऊस म्हणजेच 'व्हेरी हेवी रेन' संबोधते.
  • जोरदार पाऊस म्हणजे काय? (अंदाज 3 देताना जोरदार पाऊस (Heavy Rain) असा उल्लेख हवामान विभागाद्वारे केला जातो.
  • एखाद्या भागात ६४.५ ते ११५.५ मिमी पावसाची शक्यता असेल, तर हवामान विभाग जोरदार पाऊस म्हणजेच 'हेवी रेन'चा इशारा देते. अंदाज देताना हवामान विभाग मध्यम पाऊस म्हणजेच 'मॉडरेट रेन' असा उल्लेख करते. १५.६ मिमीपेक्षा कमी पावसाला हलका पाऊस असे संबोधले जाते.
टॅग्स :monsoonमोसमी पाऊसweatherहवामान अंदाजnagpurनागपूर