काय? ११ वर्षीय बालकाने केले सहा वर्षीय चिमुकल्यावर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 20:13 IST2025-06-06T20:06:42+5:302025-06-06T20:13:00+5:30

Nagpur : पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

What? An 11-year-old boy abused a six-year-old toddler | काय? ११ वर्षीय बालकाने केले सहा वर्षीय चिमुकल्यावर अत्याचार

What? An 11-year-old boy abused a six-year-old toddler

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर :
११ वर्षीय आरोपी विधिसंघर्ष बालकाने एका ६ वर्षाच्या चिमुकल्याशी शारीरिक दुर्व्यवहार केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातून समोर आली आहे. याप्रकरणी पीडित पालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विधिसंघर्ष बालकाविरुद्ध पोस्को कलमाअंतर्गत अत्याचाराचा गुन्हा नोंदविला आहे.


आरोपी विधिसंघर्ष बालक व पीडित अल्पवयीन मुलगा हे दोघेही एकाच गावातील असून घरालगतच राहतात. उन्हाळ्याच्या दिवसात शाळांना सुट्या असल्यामुळे गावातील मुले एकत्र येऊन खेळतात. गत २८ मे रोजी अशाच प्रकारे गावातील मुले खेळून घरी परतल्यानंतर ११ वर्षीय आरोपी विधिसंघर्ष बालकाने ६ वर्षीय चिमुकल्याला अंगणवाडीच्या मागील बाजूस नेऊन त्याच्याशी शारीरिक दुर्व्यवहार केला. 


त्यानंतर सायंकाळच्या सुमारास पीडित चिमुकल्याचे काका गावातील पानटपरीवर बसले असता, अन्य एका तरुणाने त्यांना घटनेची माहिती देत, 'कु'कृत्याचा व्हिडीओ दाखविला. लागलीच पीडिताच्या काकाने याबाबत त्याच्या पालकाला सांगितले. आरोपी विधिसंघर्ष बालकास धाकदपट करीत, बदनामीच्या भीतीने पोलिसात तक्रार देण्याचे टाळले. मात्र, "कु" कृत्याचा व्हिडीओ चर्चेत आल्यामुळे अखेरीस पीडित चिमुकल्याच्या पालकाने बुधवारी पोलिस स्टेशन गाठत, तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विधिसंघर्ष बालकाविरुद्ध पोस्कोअंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून ठाणेदार जयप्रकाश निर्मल तपास करीत आहे. 

Web Title: What? An 11-year-old boy abused a six-year-old toddler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर