शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

ओल्या-सुक्या कचऱ्यामुळे तीन दिवसाआड कचरागाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST

नागपूर : सुंदर व स्वच्छ शहराच्या वल्गना केल्या जात असताना, घराघरांतून कचरा उचलण्याची मोहीम ओल्या व सुक्या कचऱ्यामुळे फसल्याचे ...

नागपूर : सुंदर व स्वच्छ शहराच्या वल्गना केल्या जात असताना, घराघरांतून कचरा उचलण्याची मोहीम ओल्या व सुक्या कचऱ्यामुळे फसल्याचे दिसून येत आहे. नागरिक कचऱ्याचे वर्गीकरण करीत नाहीत. यामुळे कचरागाडीवरील कर्मचाऱ्यांवरच लोकांचा कचरा वेगळा करण्याची वेळ आली आहे. यात वेळ जात असल्याने दुसऱ्या वसाहतींमध्ये दोन-तीन दिवसाआड कचऱ्याची गाडी येत आहे. नाइलाजाने लोकांना रस्त्यावर, मोकळ्या जागी कचरा फेकावा लागत आहे.

घराघरांतून कचरा गोळा करण्याचे कंत्राट दोन वेगवेगळ्या कंपन्यांना देण्यात आले आहे. झोन क्र. १ ते ५ या वसाहतींमधील कचऱ्याची जबाबदारी ‘एजी एन्व्हायरो प्रा. लि. कंपनी’ला देण्यात आली. नोव्हेंबर २०१९ पासून ही कंपनी कार्यरत आहे. विशेष म्हणजे, महापालिकेने सुरुवातीला ओला-सुका कचरा वेगळ्या करण्यावर मोठी जनजागृती केली. परंतु कोरोनाच्या काळात याकडे फारसे लक्ष दिले नाही. यामुळे पुन्हा एकत्र कचरा टाकणे सुरू झाले. आता महापालिकेने यावर आक्षेप घेतला आहे. नागरिक ओला-सुका कचरा वेगळा करून देत नाहीत. यामुळे कंपनीने आपल्या सर्व कचरा गाडीचालकांना लोकांचा कचरा वेगळा करण्याची सक्ती केली. यात बराच वेळ जातो. सकाळी ६.३० वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंतच्या कामाच्या वेळात एकाच वसाहतीतील कचरा उचलणेही शक्य होत नसल्याचे चित्र आहे. दोन दिवसांच्या वर वेळ जात असल्याने संबंधित गाडीवर अवलंबून असलेल्या दुसऱ्या वसाहतींमध्ये गाडी जाण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत आहे.

कुकडे लेआऊटमध्ये तीन दिवसांनंतर कचरागाडी

कुकडे लेआऊट येथील संजय राऊत यांनी सांगितले, नियमित असलेली कचरागाडी मागील आठवड्यापासून अचानक अनियमित झाली. रविवारी तब्बल तीन दिवसांनंतर कचरागाडी आली. गाडीतील कर्मचाऱ्यांवर कचऱ्याचा डबा दिल्यावर तो स्वत: ओला आणि सुका कचरा वेगळा करीत असल्याने वेळ लागत होता. कचरा टाकण्यासाठी लाईन लागली होती.

- नवीन बाभूळखेड्यात तीन दिवसांपासून कचरागाडीची प्रतीक्षा

नवीन बाभूळखेड्यातील क्रिस्टिना जेम्स यांनी सांगितले की, कचरागाडीची वेळ सकाळी ६.३० वाजताची आहे. झोपमोड करून गाडीची वाट पाहावी लागते. मागील तीन दिवसांपासून गाडीच आली नाही. घरात कचरा तुंबून दुर्गंधी सुटली आहे. यामुळे नाइलाजाने बाहेर कचरा फेकण्याची वेळ आली.

लोकांनी ओला-सुका कचरा वेगळा करावा

घरातूनच ओला-सुका वेगळा करण्याचे मागील कित्येक महिन्यांपासून आवाहन केले जात आहे. परंतु अनेक नागरिक हे गंभीरतेने घेत नाहीत. नकार दिल्यास हे लोक रस्त्यावर कचरा टाकतात. यामुळे आमचा कर्मचारी कचऱ्याचे वर्गीकरण करतो. यात वेळ जात आहे; परंतु लवकरच ही समस्या निकाली निघेल.

-विशाल जनबंधू

धंतोली झोनप्रमुख, एजी एन्व्हायरो प्रा. लि. कंपनी