हायकोर्टाला नायलॉन मांजा दिसला तेव्हा अधिकाऱ्यांचे डोळे बंद होते का? किती पोलिसांवर कारवाई केली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 18:23 IST2026-01-21T18:22:21+5:302026-01-21T18:23:09+5:30

Nagpur : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कठोर दंड ठोठावण्याचा आदेश दिला असतानाही मकर संक्रांतीला पतंग उडविण्यासाठी सर्वत्र नायलॉन मांजाचा वापर करण्यात आला.

Were the officers blindfolded when the High Court saw the nylon manja? How many policemen were taken action against? | हायकोर्टाला नायलॉन मांजा दिसला तेव्हा अधिकाऱ्यांचे डोळे बंद होते का? किती पोलिसांवर कारवाई केली?

Were the officers blindfolded when the High Court saw the nylon manja? How many policemen were taken action against?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने कठोर दंड ठोठावण्याचा आदेश दिला असतानाही मकर संक्रांतीला पतंग उडविण्यासाठी सर्वत्र नायलॉन मांजाचा वापर करण्यात आला. परंतु त्या तुलनेत महानगरपालिका अधिकारी व पोलिसांनी पाहिजे तशी कारवाई केली नाही. न्यायालयाने मंगळवारी ही बाब लक्षात घेता मनपा अधिकारी व पोलिसांवर कडक ताशेरे ओढले. आम्हाला सर्वत्र नायलॉन मांजा दिसून आला, पण अधिकाऱ्यांनी त्यांचे डोळे बंद ठेवले होते का?, असे न्यायालय म्हणाले.

न्यायालयात नायलॉन मांजाविरोधात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय अनिल किलोर व राज वाकोडे यांच्यापुढे सुनावणी झाली. पोलिसांनी नायलॉन मांजा वापरणाऱ्यांविरोधात केवळ दोन गुन्हे दाखल केले आहेत, अशी मौखिक माहिती सरकारी वकिलाने यावेळी दिली.

त्यावर न्यायालयाने असमाधान व तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, न्यायालयाच्या आदेशाला गांभीर्याने घेणे आवश्यक होते, पण तसे झालेले दिसत नाही, असे नमूद करून मनपा आयुक्त व पोलिस आयुक्त यांना नायलॉन मांजावरील कारवाईसंदर्भात येत्या ३० जानेवारीपर्यंत सत्य माहितीचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. प्रतिज्ञापत्रातील माहिती अयोग्य आढळून आल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशी तंबीही दिली.

किती पोलिसांवर कारवाई?

नायलॉन मांजामुळे अनुचित घटना घडलेल्या क्षेत्रातील जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई केली का? अशी विचारणादेखील न्यायालयाने पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षक यांना केली. तसेच, यासंदर्भात प्रतिज्ञापत्र मागितले.

असा आहे दंडाचा आदेश

प्राणघातक नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर २५ हजार रुपये आणि विकणाऱ्यांवर अडीच लाख रुपये दंड ठोठावण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. दंडाची रक्कम जमा करण्यासाठी विशेष बँक खातेही सुरू करण्यात आले आहे.

अपघातांची माहिती मागितली

जिल्ह्यामध्ये नायलॉन मांजामुळे किती नागरिक जखमी झाले आणि किती नागरिकांना प्राण गमवावे लागले, याची घटनास्थळासह माहिती सादर करा, असे निर्देश न्यायालयाने या प्रकरणातील न्यायालयमित्र अॅड. निश्चय जाधव यांना दिले.
 

Web Title : नायलॉन मांझे पर निष्क्रियता पर हाईकोर्ट ने उठाए सवाल; कार्रवाई रिपोर्ट तलब

Web Summary : मकर संक्रांति पर नायलॉन मांझे के उपयोग पर हाईकोर्ट ने अधिकारियों को फटकारा। प्रतिबंध और जुर्माने के बावजूद उल्लंघन जारी रहा। अदालत ने पुलिस और नगर निगम आयुक्तों से कार्रवाई रिपोर्ट मांगी है, गैर-अनुपालन पर परिणाम भुगतने की धमकी दी है और नायलॉन मांझे से संबंधित दुर्घटनाओं पर विवरण मांगा है।

Web Title : High Court Questions Inaction on Nylon Manja; Seeks Action Report

Web Summary : High Court rebuked officials for failing to curb nylon manja use during Makar Sankranti. Despite a ban and fines, violations persisted. The court demands action reports from police and municipal commissioners, threatening consequences for non-compliance and seeking details on nylon manja related accidents.