सासुरवाडीला गेले, चोरटयाने २.४६ लाखांची रोख, दागीने नेले
By दयानंद पाईकराव | Updated: June 29, 2024 18:24 IST2024-06-29T18:24:05+5:302024-06-29T18:24:59+5:30
Nagpur : २३ ते २८ जून २०२४ दरम्यान घडली घटना

Went to father-in-law's house, thief took 2.46 lakhs in cash, jewellery
नागपूर : घराला कुलुप लाऊन कुटुंबासह सासुरवाडीला गेलेल्या व्यक्तीच्या घरातील रोख २ लाख व सोन्या-चांदीचे दागीने असा एकुण २ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरून नेला. ही घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २३ ते २८ जून २०२४ दरम्यान घडली. अक्रम खान मोहम्मद खान (४०, रा. मेहंदीबाग अंडरब्रिजजवळ, यशोधरानगर) हे आपल्या घराला कुलुप लाऊन कुटुंबीयांसह जालना येथे सासुरवाडीला गेले होते.
अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. आरोपीने त्यांच्या बेडरुममधील लाकडी आलमारीतील रोख २ लाख व सोन्या-चांदीचे दागीने असा एकुण २ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र तायडे यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.