शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

आम्ही कुणालाही मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट करत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 17:51 IST

Nagpur : काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट 

नागपूर : महाविकास आघाडी एकत्र म्हणून निवडणूक लढणार आहे. जागावाटपबाबत दोनदा चर्चा झालेल्या आहेत. लवकरच पुन्हा एक बैठक होईल. मुख्यमंत्री कोण असेल हे निवडणुकीनंतर एकत्रितपणे ठरवू. आम्ही कोणालाही मुख्यमंत्री पदासाठी प्रोजेक्ट करत नाही, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.गुरुवारी नागपुरात आले असला चेन्नीथला पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आमच्यात कुठलेही मतभेद नाही. सर्वांना घेऊन चालू, आघाडी धर्म पाळू. महाराष्ट्र ही काँग्रेसचे भूमी आहे. त्यामुळे जास्त जागा लढण्यासाठी मागू, असा युक्तिवादही त्यांनी केला. अजित पवार यांनी भलेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासंदर्भात माफी मागितली असेल, मात्र महाराष्ट्रची प्रतिमा डागाळली. पुतळा कोणी बनवला, त्याचा पक्षाशी काय संबंध आहे, ही दुर्घटना कशी झाली, असे प्रश्न उपस्थित करीत महाराष्ट्राचा जो अपमान झाला त्यावर केवळ माफी मागून होणार नाही, कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. पुतळा पडला, जनतेचा पैसा गेला. देवेंद्र फडणवीस यांनी हे कोणी केले ते पाहून त्यावर कारवाई का झाली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

बदलापूरच्या घटनेवर राष्ट्रपतींनी व्यक्त व्हावेकोलकाता सोबतच महाराष्ट्राच्या बदलापूर येथील घटनेवरही राष्ट्रपतींनी व्यक्त व्हायला पाहिजे. राष्ट्रपती या देशाच्या आहेत, केवळ कोलकाताच्या नाहीत. त्यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीही बघायला पाहिजे, अशा शब्दात चेन्नीथला यांनी नाराजी व्यक्त केली.

प्रत्येक पक्ष आपापले बोलतो : बाळासाहेब थोरातउद्धव सेनेचे नेते खा. संजय राऊत हे मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांना प्रोजेक्ट करीत आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारले असता काँग्रेसचे गटनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, प्रत्येक पक्ष आपापले बोलत असतो. आमचे कार्यकर्ते आमचे कोणाचे नाव घेत असतील तर त्यात आश्चर्य मानण्याचे कारण नाही. मविआच्या दोन बैठका झाल्या आहेत. जागा वाटपाचा प्रश्न लवकरच सोडवू, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे काम सुरू आहे. महायुती सरकार घाबरले आहे. सरकारी खर्चाने प्रचार चालला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसvidhan sabhaविधानसभाChief Ministerमुख्यमंत्रीnagpurनागपूर