न्यू बालाजीनगर भाकरे लेआऊटमध्ये पहिला माळ्यापर्यंत पाणी
By मंगेश व्यवहारे | Updated: July 20, 2024 16:02 IST2024-07-20T16:01:21+5:302024-07-20T16:02:07+5:30
Nagpur : घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, दुचाकी, सोफा, दिवान, कपडे सर्व पाण्यात

Water up to first floor in New Balajinagar Bhakere Layout
नागपूर : दक्षिण नागपुरातील भाकरे लेआऊट व न्यू बालाजीनगरला जोडणारा नाल्याला पूर आल्याने भाकरे लेआऊट आणि न्यू बालाजीनगर परिसरातील अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. भाकरे लेआऊट नाल्याच्या काठावरच असल्याने पहिला माळा पाण्यात डुबला होता. घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, दुचाकी, सोफा, दिवान, कपडे सर्व पाण्यात भिजल्याने मोठे नुकसान झाले.
न्यू बालाजीनगर परिसरात सिमेंटचे रस्ते उंच झाले आणि घर खोल गेल्याने रस्त्यावर पडणारे पाणी लोकांच्या घरात शिरले. शिवाय नवीन गडरलाईन टाकूनही योग्य पद्धतीने काम न झाल्याने टॉयलेट आणि बाथरूममधून पाणी लोकांच्या घरात शिरले. येथील प्रमोद सुरजूसे यांच्या घरातील सर्व साहित्य खराब झाले. छगन ठाकरे, तिमासे यांच्या घरालाही पावसाचा फटका बसला. तर भाकरे लेआऊटमध्ये नरेंद्र पाटील, संजीव भैरम, शैलेंद्र कुचे, भीमराव सातकर, अमर मेश्राम, मंदा मुळे, प्रमोद कोरमकर, राजू तरार, अरविंद उईके, पवन मेश्राम, पुष्पा गावळे, निरज नकाशे, बाब्या चिखलकर, आशू मेश्राम यांच्या घरातील पहिला माळा पाण्याखाली आला होता.