शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सेवा बंद केल्यामुळे वॉटर टँकर मालक हायकोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 00:47 IST

पाणीपुरवठ्याकरिता सेवा घेणे बंद करण्यात आल्यामुळे अरविंद गोरले व इतर २० टँकर मालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने शुक्रवारी महानगरपालिका आयुक्त व वॉटर वर्कचे कार्यकारी अभियंता यांना नोटीस बजावून यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देमनपाला नोटीस : दोन आठवड्यात मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाणीपुरवठ्याकरिता सेवा घेणे बंद करण्यात आल्यामुळे अरविंद गोरले व इतर २० टँकर मालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने शुक्रवारी महानगरपालिका आयुक्त व वॉटर वर्कचे कार्यकारी अभियंता यांना नोटीस बजावून यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. २३ जून २०१६ रोजीच्या ई-टेंडरनुसार शहरातील पाणी टंचाईच्या वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर मालकांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर १७ आॅक्टोबर २०१६ रोजी स्थायी समितीने या टँकर मालकांना पाणीपुरवठ्याच्या समान फेऱ्या वाटप करण्याविषयी ठराव पारित केला. गेल्या मार्चपर्यंत या ठरावानुसार सेवा सुरू होती. परंतु, मार्च-२०२० मध्ये अचानक १२० टँकर मालकांची सेवा बंद करण्यात आली. त्यात याचिकाकर्त्यांचा समावेश आहे. हा निर्णय घेताना टँकर मालकांना नोटीस देण्यात आली नाही. हा निर्णय रद्द करण्यासाठी मनपाला निवेदन देण्यात आले, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. या निर्णयामुळे याचिकाकर्ते कामापासून वंचित झाले आहेत. त्यांनी कर्ज घेऊन टँकर खरेदी केले असून या व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण अवलंबून आहे. मनपाने काही विशिष्ट टँकर मालकांना लाभ पोहचविण्यासाठी वादग्रस्त निर्णय घेतला आहे. करिता, वादग्रस्त निर्णय रद्द करून याचिकाकर्त्यांना पाणीपुरवठ्याच्या फेऱ्या वाटप करण्यात याव्यात असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्रद्धानंद भुतडा यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका