आंतरजोडणीसाठी पूर्व नागपुरातील पाणीपुरवठा उद्या राहणार खंडित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 16:34 IST2025-02-16T16:32:59+5:302025-02-16T16:34:31+5:30
Nagpur : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुधारकार्यासाठी १२ तासांचे शटडाऊन

Water supply in East Nagpur to remain disrupted tomorrow for interconnection
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी १७फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते रात्री ११ या काळात महापालिका व ओसीडब्ल्यूने शटडाऊन घेतले आहे
१२ तासाच्या शटडाऊनच्या कालावधीत डिप्टी सिग्नल येथे स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ७०० एमएम बाय ७०० एमएम जलवाहिनीच्या आंतरजोडणीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्व नागपुरातील ६ जलकुंभाला पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. परिणामी अनेक वस्त्यांचा पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.
बाधित होणाऱ्या वस्त्या
- सुभान नगर ईएसआर कमांड एरिया - साईनगर, नेताजीनगर, म्हाडा कॉलनी, विजयनगर, निवृत्तीनगर, भरतनगर, लक्ष्मीनगर, गुलमोहरनगर, भगतनगर, महादेवनगर, भरतवाडा, दुर्गानगर, गुजराती कॉलनी, चंद्रनगर, जुनी पारडी, एचबी टाऊन, आभा कॉलनी, शिक्षक कॉलनी, ओमनगर, तलमलेनगर.
- मिनीमाता ईएसआर कमांड एरिया -मिनीमातानगर, जानकीनगर, पांच झोपडा, जलारामनगर, सूर्यनगर, एसआरए स्कीम, जनता कॉलनी, चिखली लेआऊट औद्योगिक क्षेत्र
- भांडेवाडी ईएसआर कमांड एरिया-पवनशक्तीनगर, अब्बुमियानगर, तुलसीनगर, अंतुजीनगर, मेहरनगर, साहिलनगर, सरजू टाऊन, खांडवानी टाऊन, वैष्णोदेवीनगर, श्रवणनगर, महेशनगर, सूरजनगर.
- पारडी ईएसआर १ कमांड एरिया-महाजनपुरा, खाटीकपुरा, कोष्टीपुरा, दीपनगर, शेंडेनगर, अम्बेनगर,
- वाठोडा अमृत ईएसआर १ कमांड एरिया-कीर्तिधर सोसायटी, श्रीरामनगर, सरिता सोसायटी, कामाक्षी सोसायटी, सरोदेनगर, न्यू संगमनगर, शिवम सोसायटी, जलारामनगर, न्यू शारदानगर, पवनपुत्र हाऊसिंग सोसायटी, नारद सोसायटी, नागपूर हाऊसिंग सोसायटी, मानसी हाऊसिंग सोसायटी.
- विनोबाभावे नगर, बीएच दुर्गानगर, गोंड मोहल्ला, उडिया मुहल्ला, गजानन मंदिर परिसर, हनुमाननगर, ठवकर वाडी, सदगुरूनगर.
- पारडी ईएसआर २ कमांड एरिया - अशोकनगर, मोरकर वाडी, सुभाष मैदान, तालपुरा, शारदा चौक, गंगाबाग, दत्ता चौक, भवानीनगर, घटाटेनगर, राम मंदिर परिसर, शिवनगर, आभानगर, नवीननगर, श्यामनगर, दुर्गानगर, शिवशक्तिनगर, पुनापुर वस्ती, भोलेश्वर सोसायटी, रेणुकानगर.