शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार पावसामुळे मेडिकल पाण्यात; शस्त्रक्रिया प्रभावित

By सुमेध वाघमार | Updated: July 20, 2024 17:50 IST

Nagpur : नेत्र व प्लास्टिक सर्जरी ढकलल्या पुढे

सुमेध वाघमारे

नागपूर : शनिवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मेडिकललाही बसला. नेत्र रोग व प्लास्टिक सर्जरी विभागाच्या शस्त्रक्रिया गृहात पाणी शिरल्याने २२ च्या वर शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्यात. वॉर्ड क्र. १३ सह, स्त्री रोग व प्रसूती विभाग, बालरोग विभाग, जेरियाट्रिक ओपीडी, आकस्मिक विभाग व जनआरोग्य योजनेच्या कार्यालयातही पाणी शिरल्याने रुग्णांसह डॉक्टरांची तारांबळ उडाली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्या मार्गदर्शनात सफाई निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी तातडीने उपाययोजना केल्या.

मेडिकलमध्ये पावसाचे पाणी शिरण्याची ही पहिली घटना नाही. सलग चार-पाच तास मुसळधार पाऊस झाल्यास रुग्णालयात पाणी शिरते. या वर्षी पाणी शिरण्यासाठी बुजलेल्या नाल्यांसोबतच ‘स्कॉय-वॉक’ कारणीभूत ठरले. मेडिकल आणि ट्रॉमा केअर सेंटरला जोडण्यासाठी स्कॉय-वॉक तयार करण्यात आला. याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. परंतु याचे बांधकाम करताना पावसाच्या पाण्याचा विचार केला नसल्याचे दिसून येते. ‘स्कॉय-वाक’वरील पाणी नेत्ररोग विभागाचा वॉर्ड क्र. १३ मध्ये शिरले, पाण्याचा लोंढा एवढा मोठा होता की पुढे हे पाणी पायऱ्यांवरून वाहून बालरोग विभागाची ओपीडी, वृद्ध रुग्णांची जेरियाट्रिक ओपीडी, स्त्री रोग व प्रसूती विभागाची ओपडी, जुने आकस्मिक विभाग, महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या कार्यालयात शिरले.  सकाळची वेळ असल्याने रुग्णांची फारशी गर्दी नसलीतरी डॉक्टर, परिचारिका व रुग्णांचा गोंधळ उडाला. वैद्यकीय अधीक्षक डॉ.गावंडे यांनी तातडीने उपाययोजना करून सर्वच भागातून पाणी बाहेर काढले. त्यामुळे काही वेळा नंतर पुन्हा ओपीडी सुरू झाली.

पाणी बाहेर काढण्यासाठी तातडीने उपाययोजना"मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी शिरले असलेतरी स्वच्छता निरीक्षक नरसिंग देवरवाड यांच्या सहकार्याने व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीमुळे तातडीने उपाययोजना करीत पाणी बाहेर काढले. यासाठी स्क्रबर ड्राय मशीनचा वापरही करण्यात आला. ज्या भागातून पाणी शिरते त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या. पाण्यामुळे कुठेही रुग्णसेवा प्रभावित झालेली नाही."-डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक मेडिकल

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर