होम आयसोलेशनमधील रुग्णांची रेमडेसिविरसाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:07 AM2021-04-14T04:07:15+5:302021-04-14T04:07:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासकीय व खासगी रुग्णालयातील बेड फुल्ल झाले आहेत. वाढत्या रुग्णांसोबतच होम आयसोलेशनमधील रुग्णांची ...

Wandering of patients in home isolation for remediation | होम आयसोलेशनमधील रुग्णांची रेमडेसिविरसाठी भटकंती

होम आयसोलेशनमधील रुग्णांची रेमडेसिविरसाठी भटकंती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शासकीय व खासगी रुग्णालयातील बेड फुल्ल झाले आहेत. वाढत्या रुग्णांसोबतच होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. यात काही गंभीर रुग्णांचाही समावेश आहे. दुसरीकडे औषध दुकानातून रेमडिसिविर विक्रीला बंदी घातल्याने होम आयसोलेशनमधील रुग्णांची रेमडेसिविर इंजेक्शनसाठी भटकंती सुरू आहे.

नागपूर शहर व जिल्ह्यात दररोज ६ ते ७ हजार कोरोना बाधित आढळून येत आहेत. यात काही गंभीर रुग्णांचाही समावेश आहे. त्यात अशा रुग्णांना आधीच आजार असल्यास अशा रुग्णांचा एचआरसीटी गुणांक कमी असला तर त्यांना रेमडेसिविर देणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. रुग्णालयात बेड मिळत नसल्याने अनेक गंभीर रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. परंतु प्रशासनाने औषध दुकानातून रेमडेसिविर विक्रीला बंदी घातली असून, काही मोजक्याच दुकानातून विक्रीला परवानगी आहे. यामुळे होम आयसोलेशनमधील रुग्णांना औषध दुकानात हे इंजेक्शन मिळणे कठीण झाले आहे. या प्रकाराने मृत्यूचे प्रमाण वाढण्याचा धोका वर्तविला आहे.

....

रेमडेसिविर मागणीच्या तुलनेत कमी

नागपूर शहर व जिल्ह्यातील रुग्णालयात बेड मिळत नाही. त्यात दररोज ६ ते ७ हजार नवीन कोविड रुग्ण आढळून येत आहेत. त्यात निवडक दुकानांनाच प्रशासनाने रेमडेसिविर विक्रीची परवानगी दिली आहे. प्रशासनाने आता थेट कोविड रुग्णालयांनाच रेमडेसिवीरचा पुरवठा सुरू केला आहे. जिल्ह्यात रोज सुमारे साडेचार हजार इंजेक्शनची गरज आहे. परंतु त्याहून कमी इंजेक्शन उपलब्ध होत असल्याने गरजूंना इंजेक्शन मिळणे कठीण झाले आहे.

....................

Web Title: Wandering of patients in home isolation for remediation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.