शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध बहिणीच्या शोधात भावाची स्मशानघाटापर्यंत भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:07 IST

- मेयोमधून संक्रमित रुग्णाला सूचनेशिवाय पाठविले होते सीसीसीमध्ये आशिष दुबे/लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे एका भावाला आपल्या ...

- मेयोमधून संक्रमित रुग्णाला सूचनेशिवाय पाठविले होते सीसीसीमध्ये

आशिष दुबे/लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे एका भावाला आपल्या वृद्ध बहिणीच्या शोधात स्मशानघाटापर्यंत भटकंती करावी लागली. दोन दिवसाच्या परिश्रमानंतर भेट झाली आणि पाणावल्या डोळ्यांनी भावाने तिला घरी नेले.

काटोल येथील एका गावातील एक ७५ वर्षीय महिला कोरोना संक्रमणाच्या विळख्यात सापडली. स्थानिक इस्पितळातून तिला नागपुरातील मनपाच्या गांधीनगरस्थित इंदिरा गांधी इस्पितळात १ एप्रिल रोजी पाठविण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याच दिवशी त्या महिलेला इंदिरा गांधी शासकीय मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल(मेयो)मध्ये पाठविण्यात आले. हॉस्पिटलच्या वाॅर्ड क्रमांक ३६ मध्ये उपचार सुरू असलेल्या बहिणीचा हालहवाल घेण्यासाठी भाऊ ८ एप्रिल रोजी मेयोमध्ये पोहोचले. मात्र, तेथे पोहोचल्यावर बहीण तेथे नसल्याची माहिती भावाला मिळाली. वृद्ध बहीण कुठे गेली, याबाबत हॉस्पिटल प्रशासनाला विचारणा केली असता, कोणतेच उत्तर मिळाले नाही. हॉस्पिटलच्या रेकॉर्डनुसार त्यांची बहीण मेयोमध्येच उपचार घेत असल्याचे स्पष्ट होत होते. परंतु, वास्तवात बहीण तेथून गायब होती. त्यामुळे बहिणीचा शोध घेत त्यांनी शहरातील सर्व हॉस्पिटल्समध्ये चकरा मारल्या. बहिणीचा पत्ता लागत नसल्याने त्यांनी स्मशानघाट व कब्रस्तानातही शोध घेतला, परंतु बहिणीचा शोध लागेना. संयोगच म्हणा, मेयो इस्पितळात त्यांना एक ॲम्ब्युलन्स चालक भेटला. त्याने त्यांची बहीण पाचपावली येथील कोविड केअर सेंटरमध्ये असल्याचे सांगितले.

----------

तात्काळ गाठले सेंटर आणि नेले घरी

पीडित वृद्ध बहिणीच्या भावाच्या सांगण्यानुसार ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार ते तात्काळ पाचपावली येथील कोविड केअर सेंटरमध्ये पोहोचले. तेथे रेकॉर्ड तपासल्यावर त्यांच्या बहिणीचा थांगपत्ता लागेना. अखेर जोखीम पत्करत त्यांनी वाॅर्डात प्रवेश केला आणि बहिणीचा शोध घेतला. तेव्हा त्यांना त्यांची वृद्ध बहीण सापडली. डॉक्टरांशी संवाद साधून त्यांनी तात्काळ आपल्या बहिणीचा डिस्चार्ज मिळविला आणि सोबत आपल्या घरी नेले.

-------

रेकॉर्ड सगळ्यांचाच असतो

यासंदर्भात मेयोचे डॉ. सागर पांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी इस्पितळात रुग्ण येण्यापासून ते जाईपर्यंत, सगळीच माहिती रेकॉर्डमध्ये नोंदविली जाते. रुग्णांच्या नातेवाईकांनी विचारले असता त्यांना माहिती दिली जाते. संबंधित वृद्ध महिलेला पाचपावली सेंटरमध्ये पाठविण्यात आल्याचा रेकॉर्डही हॉस्पिटलमध्ये होता, असे ते म्हणाले.

..............