चाकू घेऊन फिरला, पोलिसांनी तुरुंगात टाकला

By दयानंद पाईकराव | Updated: November 19, 2023 19:07 IST2023-11-19T19:07:41+5:302023-11-19T19:07:53+5:30

पोलिसांनी घेराव घालून त्याला ताब्यात घेतले.

Walked around with a knife, jailed by the police | चाकू घेऊन फिरला, पोलिसांनी तुरुंगात टाकला

चाकू घेऊन फिरला, पोलिसांनी तुरुंगात टाकला

नागपूर: चाकु घेऊन फिरणाऱ्या आरोपीला जुनी कामठी पोलिसांनी अटक केली. ही घटना रविवारी रात्री १.५० वाजताच्या सुमारास कामठी-कन्हान रोडवर चौधरी हॉस्पिटलजवळ सार्वजनिक ठिकाणी घडली.

विनय रामलाल मेश्राम (वय २२, रा. नागसेननगर, मोदी पडाव कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जुनी कामठी पोलिसांचे पथक रविवारी रात्री गस्त घालत असताना त्यांना एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी घेराव घालून त्याला ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला ४०० रुपये किमतीचा लोखंडी चाकू आढळला. सहपोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आरोपी विनय विरुद्ध कलम ४/२५, सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

 

Web Title: Walked around with a knife, jailed by the police