शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

दहा हजार दिवसांचा विलंब माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 10:39 PM

एका महिला कामगाराला सेवा नियमितीकरणासाठी औद्योगिक न्यायालयात दाद मागण्याकरिता झालेला १०,२९० दिवसांचा विलंब मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने माफ केला. तसेच, या कामगाराच्या तक्रारीवर सहा महिन्यांत निर्णय देण्याचा आदेश औद्योगिक न्यायालयाला दिला. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे कामगाराला मोठा दिलासा मिळाला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : औद्योगिक कामगाराला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका महिला कामगाराला सेवा नियमितीकरणासाठी औद्योगिक न्यायालयात दाद मागण्याकरिता झालेला १०,२९० दिवसांचा विलंब मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने माफ केला. तसेच, या कामगाराच्या तक्रारीवर सहा महिन्यांत निर्णय देण्याचा आदेश औद्योगिक न्यायालयाला दिला. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे कामगाराला मोठा दिलासा मिळाला.पुष्पा नाईक असे महिला कामगाराचे नाव असून त्या शासकीय दुग्ध योजनेत कार्यरत आहेत. १९८३ मध्ये त्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना २४० दिवस नियमित सेवा दिल्यानंतर सेवेत कायम करणे आवश्यक होते. परंतु, प्रशासनाने त्यांना या नियमाचा लाभ दिला नाही. परिणामी, त्यांनी २०११ मध्ये औद्योगिक न्यायालयात तक्रार दाखल केली होती. तसेच, या न्यायालयात दाद मागण्यासाठी झालेला १० हजार २९० दिवसांचा विलंब क्षमा करण्यासाठी स्वतंत्र अर्ज दाखल केला होता. २४ नोव्हेंबर २०१६ रोजी औद्योगिक न्यायालयाने विलंब माफ करण्यास नकार देऊन मूळ तक्रार खारीज केली. त्या निर्णयाविरुद्ध नाईक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांची याचिका मंजूर झाली. नाईक यांच्यावतीने अ‍ॅड. सलिम खान व अ‍ॅड. आरती सिंग यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे