शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

शेडेश्वर येथे वाघोबा आला रे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 12:42 AM

Tiger जंगलालगतच्या शेडेश्वर (ता.उमरेड) गाव व परिसरात गुरांच्या शिकारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेकांनी बिबट्यांसह वाघालाही या भागात वावरताना बघितले आहे. त्यामुळे कुणीही शेतात कामाला जाण्याची हिंमत करीत नसल्याने, पिकांच्या मशागतीची कामे ठप्प झाली आहेत.

ठळक मुद्देशेतीची कामे झाली ठप्प : गुरांच्या शिकारीची प्रमाणही वाढले

लाेकमत न्यूज नेटवर्कबेला : जंगलालगतच्या शेडेश्वर (ता.उमरेड) गाव व परिसरात गुरांच्या शिकारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेकांनी बिबट्यांसह वाघालाही या भागात वावरताना बघितले आहे. त्यामुळे कुणीही शेतात कामाला जाण्याची हिंमत करीत नसल्याने, पिकांच्या मशागतीची कामे ठप्प झाली आहेत.हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त असून, या जंगलात वाघ, बिबटे व इतर वन्य प्राण्यांचा वावर आहे. मागील वर्षी या भागात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला हाेता. त्या बिबट्याने शिवारासह गावात येऊन गाई, वासरे, बकऱ्या व काेंबड्यांची शिकार केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. त्यानंतर, वन कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत, त्या बिबट्याला जेरबंद केले आणि दूरवरच्या जंगला नेऊन साेडले. त्यामुळे येथील नागरिक काहीसे भयमुक्त झाले हाेते. दरम्यान, अलीकडच्या काळात याच भागात पुन्हा वाघाची दहशत निर्माण झाली आहे. या वाघाला दिवसा शेडेश्वर शिवारात फिरताना बघितल्याचे अनेकांनी सांगितले. त्याने साेमवारी (दि.१९) वसंता आसाेले, रा.शेडेश्वर यांच्या बकरीवर हल्ला चढविला हाेता. त्यानंतर, त्याने मंगळवारी (दि. २०) वामन चावले, रा.शेडेश्वर यांच्या गाेठ्यात शिरून दाेन बकऱ्यांची शिकार केली. तत्पूर्वी त्याने रविवारी (दि. २५) मध्यरात्री परमेश्वर तुळशीराम शिरजाेशी, रा.शेडेश्वर यांच्या दाेन बकऱ्यांचा फडशा पाडला. गुरांच्या या वाढत्या शिकारीमुळे या भागात वाघाची दहशत निर्माण हाेत आहे. वनकर्मचाऱ्यांनी माहिती मिळताच, या सर्व घटनांचा घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या वाघामुळे शेतात कामाला जाण्याची हिंमत हाेत नसल्याचे शेतकऱ्यांसह मजुरांनी सांगितले. या वाघाचा वाढता उपद्रव लक्षात घेता, वनविभागाचे त्याचा बिबट्याप्रमाणे याेग्य बंदाेबस्त करावा, अशी मागणीही शेडेश्वर  येथील शेतकऱ्यांसह नागरिकांनी केली आहे. 

नुकसान भरपाईची तरतूदवाघ किंवा बिबट्याच्या हल्ल्यात माणसाचा मृत्यू झाल्यास त्याला १५ लाख रुपये, अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये गंभीर जखमी झाल्यास, १ लाख २५ हजार रुपये, किरकाेळ जखमी झाल्यास २० हजार रुपये, तसेच गाय, म्हैस व बैलाचा मृत्यू झाल्यास त्याच्या बाजारभावाच्या ७५ टक्के किंवा ६० हजार रुपये, बकरी, मेंढी व इतर पशुधनाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या बाजारभावाच्या ७५ टक्के किंवा १० हजार रुपये, हे पशुधन जखमी झाल्यास चार हजार रुपये किंवा त्याच्या कमी रक्कम राज्य शासनाकडून नुकसान भरपाई म्हणून दिली जाते.

टॅग्स :Tigerवाघnagpurनागपूर