संघ सरकार्यवाह होसबळे यांची कोराडी मंदिराला भेट
By योगेश पांडे | Updated: December 14, 2023 22:53 IST2023-12-14T22:52:47+5:302023-12-14T22:53:21+5:30
होसबळे यांनी रामायण सांस्कृतिक केंद्र आणि भारत माता भवनालादेखील भेट दिली.

संघ सरकार्यवाह होसबळे यांची कोराडी मंदिराला भेट
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी गुरुवारी कोराडी येथील महालक्ष्मी मंदिराला भेट दिली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. होसबळे यांनी रामायण सांस्कृतिक केंद्र आणि भारत माता भवनालादेखील भेट दिली.
यावेळी संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख स्वांत रंजन, संघाचे नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, विदर्भ प्रांत सहसंपर्क प्रमुख अरविंद कुकडे, भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केद्रांचे अध्यक्ष राजेंद्र पुरोहित प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी होसबळे यांनी मंदिरातील विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.