Viral information that RSS chief Mohan Bhagvat is drafting new constitution; File a complaint in police | सरसंघचालक नवीन संविधान बनवत असल्याची माहिती व्हायरल; संघाकडून तक्रार दाखल

सरसंघचालक नवीन संविधान बनवत असल्याची माहिती व्हायरल; संघाकडून तक्रार दाखल

नागपूर : डाव्या विचारसरणीच्या पक्षांकडून नेहमीच भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानात बदल करण्याचे आरोप केले जातात. सोशल मिडीयावर सध्या सरसंघचालक मोहन भागवत भारताचे नवीन संविधान बनवत असल्याची एक पीडीएफ फाईल व्हायरल होऊ लागली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. 


सरसंघचालक मोहन भागवत नवीन भारतीय संविधान बनवत असल्याचा खोटा प्रचार करण्यात येत आहे. त्याची एक पीडीएफ फाईल बनवून व्हॉट्स अॅपवर फिरवण्यात येत आहे. या पीडीएफ फाईलच्या मुखपृष्ठावर सरसंघचालकांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. हा खोटा प्रचार केला जात असून भागवत यांची बदनामी केली जात असल्याचा आरोप संघाकडून केला जात आहे. 


तसेच सरसंघचालक मोहन यांच्या नावाने चुकीची माहिती सोशल मीडियात व्हायरल केली जात असून ती टाकणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याविरोधात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Web Title: Viral information that RSS chief Mohan Bhagvat is drafting new constitution; File a complaint in police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.