शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

नागपुरात व्हीआयपी वाहन परवान्यांचे गौडबंगाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:01 AM

‘आॅनलाईन’ प्रणालीतील घोळामुळे तक्रारकर्त्या उमेदवारांना सुटीच्या दिवशी, कार्यालयीन वेळेनंतरही वाहन परवाना देण्याचे निर्देश परिवहन विभागाने दिले. परिणामी, जून २०१७ ते जुलै २०१८ या कालावधीत राज्यात सुमारे सव्वा लाख परवाने ‘व्हीआयपी’ कोट्यातून देण्यात आले.

ठळक मुद्देवर्षाला सव्वा लाख व्हीआयपी वाहन परवानेकारणे शोधण्याऐवजी निलंबनाची कारवाई

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘आॅनलाईन’ प्रणालीतील घोळामुळे तक्रारकर्त्या उमेदवारांना सुटीच्या दिवशी, कार्यालयीन वेळेनंतरही वाहन परवाना देण्याचे निर्देश परिवहन विभागाने दिले. परिणामी, जून २०१७ ते जुलै २०१८ या कालावधीत राज्यात सुमारे सव्वा लाख परवाने ‘व्हीआयपी’ कोट्यातून देण्यात आले. याच्या तक्रारी झाल्याने सर्वाधिक परवाने देणाऱ्या नागपूरच्या एका सहायक मोटार वाहन निरीक्षकाला तडकाफडकी निलंबित केले. परंतु त्यामागील कारण शोधण्याचा प्रयत्नच झाला नाही. यामुळे परिवहन विभागाच्या कार्यप्रणालीवरच शंका उपस्थित केली जात आहे.प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने आणि अधिक कार्यक्षमतेने चालू राहण्यासाठी ‘वाहन ४.०’ आणि ‘सारथी ४.०’ या अद्ययावत प्रणालींचा अंतर्भाव करण्यात आला. यातील परवान्यासाठी असलेली ‘वाहन ४.०’ ही प्रणाली किचकट असल्याने आजही ७५ टक्के उमेदवार दलालांकडून, खासगी आॅनलाईन केंद्र किंवा नेट कॅफेकडून प्रति अर्ज १०० रुपये देऊन अर्ज भरून घेतात. यातही आवश्यक दस्तावेज ‘डाऊनलोड’ करण्यासाठी व ‘आॅनलाईन पेमेंट’ करण्यासाठी वेगळे ५० रुपये देतात. साधारण एका परवान्यामागे अर्जदाराला २०० ते ५०० रुपयांचा भुर्दंड पडतो.यातही ‘आॅनलाईन’ संथगतीची व कधीही ठप्प पडणारी आहे. यातच ‘अपॉर्इंटमेंट’ घेताना मर्जीनुसार तारीख मिळत नाही. तारीख मिळायला दोन महिन्यावर कालावधी लागतो. याविषयी तक्रारी वाढल्याने परिवहन विभागाने यासंदर्भातील आढावा अहवाल दरमहा पाठविण्याचे सूचना दिल्या. सोबतच रोज गैरहजर राहण्याचे प्रमाण लक्षात घेऊन त्या पद्धतीने अपॉर्इंटमेंटचा कोटा वाढविण्याचा तसेच कार्यालयीन वेळेच्या आधी आणि नंतरही व आवश्यक तेथे सुटीच्या दिवशी चाचणीचे कार्य सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. ज्या उमेदवाराला मुदत संपणाऱ्या तारखेनंतर अपॉर्इंटमेंट मिळत असेल अशांना गैरहजर राहणाऱ्यांच्या जागी समायोजित करण्याच्याही सूचना परिवहन विभागाने दिल्या. सूचनेनुसार अशा उमेदवारांची ‘व्हीआयपी’ कोट्यातून परवाना देणे सुरू झाले. गेल्या वर्षभरात राज्यभरातील आरटीओ कार्यालयांनी साधारण सव्वा लाख ‘व्हीआयपी’ कोट्यातून परवाने दिले. यात नागपुरातील शहर आरटीओ कार्यालयातून एका सहायक निरीक्षकाने ‘व्हीआयपी’ कोट्यातून सर्वाधिक म्हणजे चार हजारावर शिकाऊ परवाने दिले. याची तक्रार झाल्यावर त्या निरीक्षकावर निलंबनाची कारवाई झाली. परंतु ‘व्हीआयपी’ कोट्यातून एवढ्या मोठ्या संख्येत परवाने देण्यामागील कारण काय, याकडे मात्र कुणीच लक्ष देत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.

पुणे, मुंबई व नागपुरात महिन्याकाठी हजारावर व्हीआयपी परवानेपुणे, मुंबई व नागपूरसारख्या मोठ्या आरटीओ कार्यालयांतर्गत महिन्याकाठी सरासरी १००० ते १२०० शिकाऊ परवाने देण्यात आले तर छोट्या शहरातील आरटीओ व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सरासरी ३०० ते ५०० परवाने व्हीआयपी कोट्यातून देण्यात आले. या परवान्याचा रोजचा अहवाल परिवहन विभागाला पाठविला जातो. त्यामुळे त्याचवेळी कारवाई का करण्यात आली नाही असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस