लॉकडाऊनचे उल्लंघन, १०२९ जणांविरूद्ध प्रतिबंधक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 23:48 IST2020-04-24T23:46:48+5:302020-04-24T23:48:06+5:30
लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या १०२९ जणांविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. १००५ वाहनचालकांवर चालान कारवाई केली. तर ६ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

लॉकडाऊनचे उल्लंघन, १०२९ जणांविरूद्ध प्रतिबंधक कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या १०२९ जणांविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. १००५ वाहनचालकांवर चालान कारवाई केली. तर ६ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असल्याचे सांगून, नागरिकांना घरातच राहण्याचे पोलिस वारंवार आवाहन करीत आहेत. मात्र मनाई आदेश झुगारून अनेक रिकामटेकडे विनाकारण घराबाहेर फिरत आहेत. पोलिसांनी गेल्या २४ तासात अशा एकूण १०२९ रिकामटेकड्यांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली आहे
कोणतेही काम नसताना सहज फिरताना आढळलेल्या १००५ वाहनधारकांवरही पोलिसांनी चालान कारवाई केली असून ६ वाहने जप्त केली आहेत. वारंवार सूचना, आवाहन करूनही अनेकांवर त्याचा परिणाम होताना दिसत नसल्याने पोलिसांनी अशा काही जणांवर वेगवेगळ्या भागात वेगळी कारवाई केली. वेगवेगळ्या प्रकारचे स्लोगन असलेले फलक त्यांच्या गळ्यात घालून त्यांचे फोटो काढले. त्यातील अनेकांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले.