शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

VidhanSabha2019: काटोलमध्ये लढणार कोण, भाजप की शिवसेना?; रामटेकचाही तिढा सुटेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 08:03 IST

शिवसेनेच्या मुलाखतींनी वाढविला भाजप इच्छुकांचा बीपी

जितेंद्र ढवळे

नागपूर : विदर्भाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका वठविणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि रामटेक मतदार संघावर भाजप आणि शिवसेनेने दावा केला आहे. युतीत या दोन्ही जागा भाजपच्या वाट्याला येणार असल्याने येथील इच्छुक उमेदवारांना कामाला लागण्याचे संकेत पक्षाकडून देण्यात आले. मात्र शनिवारी पारंपारिक युतीत शिवसेनेकडे असलेल्या काटोल आणि रामटेक मतदारसंघासह जिल्ह्यातील बाराही मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती शिवसेनेच्या वतीने मुंबईत घेण्यात आल्या. त्यामुळे युतीत जिल्ह्यातील नेमक्या कोणत्या जागा शिवसेनेला जाणार आहेत, अशी विचारणा स्थानिक भाजप नेत्यांकडून केली जात आहे.

१५ दिवसांपूर्वी नागपुरात झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचे प्रदेश महामंत्री आ.अतुल भातखळकर यांनी काटोल आणि रामटेकची जागा भाजपच लढणार असल्याचे सांगत स्थानिक नेत्यांना आश्वस्त केले होते. २०१४ मध्ये ज्या मतदार संघातून भाजपचे उमेदवार निवडूण आले त्या जागा शिवसेनेला सुटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. २०१४ मध्ये काटोलमध्ये भाजपचे आशिष देशमुख तर रामटेकमध्ये डी.मल्लिकार्जुन रेड्डी विजयी झाले होते.

काटोलमध्ये आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने या जागेवर आता शिवसेनेने दावा केला आहे तर रामटेक सेनेचा पारंपारिक मतदार संघ असल्याने युतीत ही जागा भाजपला सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका सेनेच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे युती झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काटोल आणि रामटेकच्या जागेबाबत काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.विधानसभा निवडणूक निकाल (२०१४)काटोल मतदारसंघ आशिष देशमुख - भाजपा (७०,३४४)अनिल देशमुख -राष्ट्रवादी काँग्रेस (६४,७८७)राजेंद्र हरणे - शिवसेना (१३,६४९)राहुल देशमुख- शेकाप (९,५८९)रामटेक मतदारसंघ डी.मल्लिकार्जुन रेड्डी - भाजपा (५९,३४३)आशिष जयस्वाल - शिवसेना (४७,२६२)सुबोध मोहिते - काँग्रेस (३५,५४६)अमोल देशमुख - राष्ट्रवादी (९,१६२) 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस