शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विधान भवन बाटल्यांनी तुंबले; कामकाज पावसाने धुतले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 06:17 IST

शहरासह संपूर्ण नागपूर जिल्ह्याला शुक्रवारी पावसाने चांगलेच झोडपून काढले. सकाळी ८.३० वाजल्यापासून अवघ्या सहा तासांत २६३.५ मिमी पावसाची नोंद झाली.

नागपूर : शहरासह संपूर्ण नागपूर जिल्ह्याला शुक्रवारी पावसाने चांगलेच झोडपून काढले. सकाळी ८.३० वाजल्यापासून अवघ्या सहा तासांत २६३.५ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने नागपुरात एक बळी घेतला. बहुतांश वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागपूरचे ‘जलपूर’ झाले. विधानभवनही जलमय झाले. तेथील इलेक्ट्रिक केबिनमध्ये पाणी शिरून वीज खंडित झाल्याने विधिमंडळाचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवत ‘पाऊस कोंडी’ केली. ‘सरकार नागपुरात अन् नागपूर पाण्यात’ असे चित्र होते.नागपुरातील दोनशेहून अधिक वस्त्यांमध्ये पाणी तुंबले. सुरक्षित सिव्हिल लाइन्समधील मंत्र्यांची निवासस्थान असेलला रविभवन व आमदार निवास परिसरही जलमय झाला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कुटीरसह बऱ्याच मंत्र्यांच्या बंगल्यांत पाणी शिरले. मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्याबाहेरही गुडघाभर पाणी साचले होते. पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने जिल्हाधिकाºयांनी शाळांना सुटी जाहीर केली आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर पावसाची रिपरिप सुरू झाली. शुक्रवारी सकाळनंतर पावसाचा जोर जास्त वाढला.मुख्यमंत्र्यांचा ‘वॉच’मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनातील परिस्थितीचा आढावा घेतला. नागपूर महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून पावसामुळे विविध भागात निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेतली.शहरात ७00 ठिकाणी ३८०० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्याद्वारेमुख्यमंत्र्यांनी पूरग्र्त भागांची केली. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मिशनमोडवर काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्या.कामकाज तहकूबविधानसभेचे कामकाज सकाळी १० वाजता सुरू होणार होते. पण रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे बहुतांश आमदार वेळेवर सभागृहात पोहचू शकले नाहीत. विधानभवन परिसरातील गटारे तुंबल्यामुळे पाण्याचा निचरा होत नव्हता.त्यामुळे तिथे तलावाचे स्वरुप आले. विधानभवनात वीज नसल्याने कामकाज एक तास उशिरा सुरू करण्याची घोषणा विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.त्यानंतरही सुधारणा न झाल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.दारूच्या बाटल्याऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाण्यात उतरून विधानभवन परिसराची पाहणी केली. पाणी काढण्यासाठी तातडीने मोटार पंप लावण्यात आले. विधानभवनाच्या मागील गटार तुंबले होते. विधानसभा, परिवहनमंत्री दिवाकर रावते, बावनकुळे यांच्या समक्ष गटाराचे झाकण काढले असता आत दारुच्या बाटल्यांचा खच सापडला.

टॅग्स :nagpurनागपूरRainपाऊस