VIDEO : सरसंघचालक गाणे म्हणतात तेव्हा...
By Admin | Updated: August 18, 2016 16:54 IST2016-08-18T14:42:00+5:302016-08-18T16:54:03+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचे नाव घेताच डोळ्यासमोर येतो तो करारी भावमुद्रा असलेला चेहरा. पण त्यांच्यात एक सुरेल गायकदेखील दडला आहे.

VIDEO : सरसंघचालक गाणे म्हणतात तेव्हा...
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १८ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचे नाव घेताच डोळ्यासमोर येतो तो करारी भावमुद्रा असलेला चेहरा. परंतु त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू असून त्यांच्यात एक सुरेल गायकदेखील दडला आहे. स्वातंत्र्यदिनी एका शाळेत मुख्य अतिथी म्हणून गेले असताना त्यांच्यातील गायकाचे अनेकांना दर्शन झाले.
डॉ.भागवत यांना अनेक स्वयंसेवकांनी संघाच्या घोष पथकातील वाद्ये वाजविताना पाहिलेले आहे. त्यांच्या गायनाची ‘आॅडियो क्लिप’देखील ‘व्हायरल’ झाली होती. परंतु प्रभावी वक्ता असलेल्या डॉ.भागवतांनी ‘जय भारती’ या गाण्याचे गायन केले व त्यांच्यातील गायक उपस्थितांना अनुभवता आला.